नाशिक : बळीराज जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत, शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याची दहशत पसरली असल्याने त्वरित पथदीप बसविण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.बळीराज जलकुंभ ते आडगाव-म्हसरूळ जोडणारा शिवरस्ता (रिंगरोड) मेडिकल कॉलेज, ग्रामीण पोलीस मुख्यालय, म्हसरूळ, आडगाव, नर्सिंग कॉलेजकडे जाण्याचा जवळचा मार्ग असून, या रस्त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताणदेखील कमी होतो. या मार्गावर अनेक वेळा सोनसाखळी चोऱ्या, भुरट्या चोऱ्या यांसारख्या गंभीर घटना घडलेल्या आहे. या परिसरात बिबट्यासह वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. या अर्ध्या मार्गावर पथदीप बसविलेले आहे, पण अर्धा मार्ग अंधारातच आहे़आडगाव म्हसरूळ शिवरस्त्या शाळा, कॉलेज, पोलीस वसाहत मेडिकल कॉलेजकडे जाणारा जवळचा मार्ग असल्याने कायम वर्दळ असते या परिसरात लोकांची संख्या अधिक पण बिबट्याचा वावर असल्यामुळे भीतीचे वातावरण असते शिवाय अंधारात या मार्गाने जाण्याचे अनेक लोक टाळतात. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पथदीप बसवावे. - रामभाऊ जाधव, स्थानिक रहिवासी
आडगाव-म्हसरूळ रस्ता अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:03 AM