लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी (दि.२५) विद्यमान अध्यक्ष माजी खासदार प्रताप सोनवणे, सभापती अॅड. नितीन ठाकरे, संचालक रवींद्र देवरे, दिलीप पाटील, भाऊसाहेब खातळे, दिलीप मोरे यांच्यासह आजी-माजी संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण ८१ उमेदवारी अर्ज दाखल, तर ६४२ अर्जांची विक्री करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत अध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांमध्ये विजय पवार, यशवंत अहिरे, विजयकुमार निकुंभ, दिलीप मोरे यांचा समावेश आहे. सभापतिपदासाठी विजय पवार, यशवंत अहिरे, माणिकराव बोरस्ते, दिलीप मोरे तसेच विद्यमान अध्यक्ष प्रताप सोनवणे, उपसभापती पदासाठी विजय पवार, मनोहर देवरे, दिलीप दळवी,उद्धव निरगुडे, बाळासाहेब पाटील, अशोक सावंत, भाऊसाहेब मोरे, पांडुरंग सोनवणे, कैलास अहिरे, अरुण वाघ, दिलीपराव मोरे यांचे, तर सरचिटणीस पदासाठी विद्यमान सभापती अॅड. नितीन ठाकरे, विजय पवार, तसेच विद्यमान अध्यक्ष प्रताप सोनवणे यांचा समावेश आहे. चिटणीस पदासाठी विजय पवार, मनोहर देवरे, दिलीपराव मोरे, डॉ. विलास बच्छाव,डॉ. भाऊसाहेब मोरे, दत्तात्रय ढिकले, उद्धव निरगुडे यांचा समावेश आहे. तसेच इगतपुरी तालुका संचालक पदासाठी विद्यमान संचालक भाऊसाहेब खातळे यांच्यासह दामोदर पागेरे, विजय कडलग, वसंत मुसळे, बाळू कुकडे, बाबूराव गोवर्धने, कळवण-सुरगाणा तालुका संचालक पदासाठी विद्यमान संचालक रवींद्र देवरे तसेच नारायण हिरे, बाजीराव पवार, विजय पवार, अशोक पवार, दादाजी पाटील, राजेंद्रनाथ पवार, नांदगाव तालुक्यासाठी विद्यमान संचालक दिलीप पाटील यांच्यासह तेज कवडे, प्रकाश कवडे, साहेबराव पाटील, मनसुख पाटील यांनी, तर बागलाण तालुक्यातून मधुकर कापडणीस, माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, दिलीप दळवी, मनोहर देवरे, चंद्रकांत कापडणीस, खेमराज कोर, बाळासाहेब पाटील यांच्यासह १४ अर्ज दाखल झाले आहेत. मालेगाव तालुक्यातून दशरथ निकम व काशीनाथ पवार, येवला तालुक्यातून रामहरी संभेराव, विठ्ठलराव शेलार यांच्यासह ११ अर्ज दाखल झाले आहेत. सिन्नर तालुक्यातून राजेंद्र चव्हाणके व अशोक मुरकुटे, देवळा तालुक्यातून योगेश अहेर, नाशिक तालुक्यातून बाळकृष्ण हांडोरे, दिलीप थेटे, पुंडलिक थेटे यांनी अर्ज दाखल केले आहे. येत्या २७ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
अध्यक्ष, सभापतींसह ८१ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 1:12 AM