नाशिक : मैत्री आयुष्यभराची फाउंडेशनतर्फे ‘एक भेट मोलाची, सामाजिक ऋ णाची’ या उपक्र मांतर्गत आदिवासी पाड्यावरील बांधवांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांना फराळ, कपडे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत संस्थेकडून आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. बालकांना कपडे व महिला व ज्येष्ठांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. संस्थेने हैदपाडा, हैदुलीपाडा येथील बांधवांच्या वाड्या-वस्त्यांवर लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही कपडे व ब्लँकेटची भेट देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब बोराडे, बापू ताजनपुरे, गजानन चव्हाण, रेवण कांगणे, प्रशांत पाटील, सचिन सोर, डॉ. शरद गायकवाड, सचिन चिखले, अनिल गायखे, धनंजय सरक, दत्तात्रय अलगट, अतुल ब्रह्मेचा, अशोक थेटे आदींनी दिवाळीचा आनंद घेतला. जयहिंद कॉलनी, बहुद्देशीय संस्था सिडको परिसरातील महाजननगर येथील जयहिंद कॉलनी, बहुद्देशीय संस्थेच्या वतीने हाडपाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे आदिवासी समाजबांधवांना कपडे आणि फराळाचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने आदिवासी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक प्रतिभा पवार, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण, दिलीप राऊत, नितीन चौधरी, दिलीप वाघ, प्रभाकर भाकरे, मिलिंद वाणी, शकुंतला चव्हाण, शोभा वाघ, हेमलता पाटील आदी उपस्थित होते.श्री स्वामिनारायण शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्रशासक माधवप्रकाश स्वामी, मुख्याध्यापक अस्मिता पटेल उपस्थित होते. यावेळी कन्या विद्यालयात मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यात फराळाच्या वस्तू वाटप करून गोरगरिबांची दिवाळी आनंदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आदिवासींची दिवाळी झाली गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:01 AM