ठळक मुद्देगिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
नाशिक : शेतीची कामे संपल्यानंतर पोटा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ञ्यंबक तालुक्यातील विविध गाव, पाड्यांवरील आदिवासींचे जथ्थे गिरणारे येथे दाखल झाले आहेत. तालुक्यात तांदुळ प्रमुख पिक असताना यंदा उत्पादनात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने आदिवासींचे मोठयÞा प्रमाणावर रोजगारासाठी स्थलांतर सुरू झाले. शिवाय हे काम केवळ तीनच महिने असल्याने उरलेल्या ९ महिन्यात करायचे काय असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. गिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे. उपजिविकेसाठी शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांना आता रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागत आहे. अनेक गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) कामे असताना या लोकांना आपला संसाराचा गाडा ओढण्यासाठी खेड्यातुन बाहेर पडावे लागते. या आदिवासी मजुरांना आता शहरी भागात धाव घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही. गावात कामे उपलब्ध नसणे, वेळेवर मजुरी न मिळणे, मुलभूत सोयीसुविधाही न मिळणे अशा अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यातच सरकारी अनास्थेचे दुष्परिणाम देखील आदिवासींना जाणवू लागले आहे. ग्रामीण भागात काम न मिळाल्यास ते नाशिकसारख्या मोठ्या शहरात बांधकाम, कंपन्या, रस्ते अशा मिळेल त्या ठिकाणी काम करत आहेत.उदरनिर्वाहासाठी आदिवासींचे जथ्थे गिरणारे येथे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:49 AM