विंचूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील बेजबाबदार दुकानदार व बेशिस्त नागरिकांवर प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली.गेल्या दोन महिन्यांत येथे एकूण १४ कोरोना बाधित रु ग्ण आढळून आले आहेत. या पाशर््वभूमीवर येथील नोडल आँफीसर अभिमान माने यांच्या अध्यक्षतेखाली येथील कर्मवीर विद्यालयाच्या प्रांगणात कोविड १९ समितीची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत भाजीपाला विक्र ेते व इतर व्यवसायिकांसाठी जागेचे नियोजन करणे, विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे. दर गुरु वारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनांनी बंद पाळणे. विनापास बाहेर गावी जाणाºया येणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंग अथवा शासनाच्या मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन करणाºया दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करणे आदी निर्णय घेण्यात आले.वरील निर्णयांतर्गत येथील आठ बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, येथील संशयित रु ग्णांना पिंपळगाव (ब) विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे. या रु ग्णांकडे आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याची तक्र ार नानासाहेब जेऊघाले यांनी नोडल अधिकाºयांकडे केली. यावेळी भाजपाचे कैलास सोनवणे, रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार सुनील मालपाणी निफाड पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, विंचूरच्या सरपंच वंदना कानडे, उपसरपंच भास्कर परदेशी, सदस्य निरज भट्टड, इस्माईल मोमीन, ग्रामविकास अधिकारी जी.टी. खैरनार, तलाठी सागर शिर्के, किशोर पाटील, भाऊसाहेब हुजबंद,संदीप शिरसाट, प्राचार्य नंदकुमार देवढे,पो.हवा. योगेश शिंदे आदी उपस्थित होते.
विंचूरला बेशिस्त नागरिकांवर प्रशासनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 1:40 PM