इंदिरानगर : मनपाच्या उपकार्यालयाची कागदपत्रे, संगणक व खुर्ची-टेबल सत्यम सोसायटीतील मनपाच्या समाजमंदिरात हलविण्यात आले; परंतु तेथे काम करणाऱ्या कर्मचाºयांना बसण्यास जागाच न राहिल्याने त्यांना घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य कामांसाठी जागाच उरली नाही. त्यामुळे कर्मचारी लोकसुविधा केंद्रात उभे राहून किंवा नागरिकांसाठी बसण्यासाठी असलेल्या जागेवर बसून काम करताना दिसून येत आहे. येथील महापालिकेच्या उपकार्यालयाची लाखो रुपयांचा महसूल देऊनही स्वमालकीच्या जागेअभावी अद्यापही फरपट सुरू आहे. इंदिरानगर परिसरातील मिळकतधारकांच्या मागणीनुसार सुमारे पंधरा वर्षांपूर्वी कमोदनगर येथील मनपाच्या हजेरी शेडमध्ये उपकार्यालय सुरू करण्यात आले होते. सदर पत्र्याच्या शेडमध्ये उपकार्यालय सुरू करण्यात आल्याने त्या ठिकाणी काम करणारे सुमारे तेरा कर्मचारी उन्हाळ्यात उन्हाच्या तडाख्यामुळे आणि पावसाळ्यात पावसाचे पाणी आत शिरत असल्याने कर्मचाºयांना बसणेसुद्धा मुश्कील झाले होते. तसेच तेथे येणाºया नागरिकांना त्रास होत असे. उन्हाळ्यात तर उन्हाच्या तडाख्यामुळे अधिकारी व कर्मचारी झाडांचा आश्रय घेऊन काम करीत असे, अशा बिकट परिस्थितीत सुमारे सहा ते सात वर्षे पत्र्याच्या शेडमध्ये कार्यालय होते. नागरिक आणि अधिकाºयांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अखेर शंभर फुटी रस्त्यालगत असलेल्या लोकसुविधा केंद्रात सुमारे सात वर्षांपूर्वी उपकार्यालय सुरू करण्यात आले; परंतु लोकसुविधा केंद्राची जागा अपुरी असल्याने अधिकाºयांना खुर्ची ठेवल्यावर आलटून-पालटून बसावे लागत होते. तेथेही पत्र्याचे छत असल्याने उन्हाळ्याच्या तडाख्यापासून कर्मचारी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.सुमारे दहा महिन्यांपूर्वीच लोकसुविधा केंद्र सुरू करण्यात आल्याने उपकार्यालय तेथून हटविण्यात आले. त्याठिकाणी घरपट्टी व पाणीपट्टी स्वीकारणे आणि आधार कार्ड केंद्र सुरू करण्यात आले, त्यामुळे मनपाच्या उपकार्यालयची कागदपत्रे, संगणक व खुर्ची-टेबल सत्यम सोसायटीतील मनपाच्या समाजमंदिरात हलविण्यात आले; परंतु तेथे काम करणाºया कर्मचाºयांना बसण्यास जागाच न राहिल्याने त्यांना घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कामांसाठी जागाच उरली नाही.कर्मचारी लोक सुविधा केंद्रात उभे राहून किंवा नागरिकांसाठी बसण्यासाठी असलेल्या जागेवर बसून काम करताना दिसून येत आहे. परिसरातील हजारोंच्या संख्येने राहणारे मिळकतदार पाणीपट्टी व घरपट्टी याच उपकार्यालयात भरत असल्याने त्यामुळे महापालिकेला लाखो रु पयांचा महसूल मिळतो; परंतु गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेच्या स्वमालकीच्या जागेत उपकार्यालय सुरू करण्याची मागणी धूळ खात पडून आहे. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांची होणारी गैरसोय केव्हा थांबेल, असा प्रश्न त्रस्त नागरिकांनी केला आहे.बिले काढण्यासाठी एकच संगणकया उपकार्यालयाकडून पाणी आणि घरपट्टीद्वारे लाखो रु पयांचा महसूल मिळतो तरी अद्यापही स्वमालकीच्या जागेत उपकार्यालय का होत नाही, मनपाचे अनेक भूखंड पडून असूनही त्याचा उपयोग का केला जात नाही, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. सुमारे बारा हजार घरपट्टी मिळकतधारक व सुमारे पाच हजार पाणीपट्टीधारक असून, या सर्वांची बिले काढण्यासाठी एकच संगणक आहे.
उपकार्यालयाचा कारभार अद्याप समाजमंदिरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:44 AM