नाशिक : व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, मेसेज यांसह सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांवर केल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारातील खर्चावरही यंदाच्या निवडणुकीपासून प्रशासन करडी नजर ठेवणार आहे. त्यासाठी या माध्यमांवरील देखरेखीसाठी स्वतंत्र पथक तर खर्चाच्या दरांचा स्वतंत्र तक्तादेखील बनविण्यात येणार आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.लोकसभेची निवडणूक ४७२० मतदान केंद्रांवर घेण्यात आली होती. यावेळच्या विधानसभा निवडणुकीसाठी ४५७९ मतदान केंद्रं सज्ज करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभांच्या निवडणुकीची तयारी व आदर्श आचारसंहितेबाबतची माहिती दिली. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, पोलीस उपअधीक्षिक शर्मिष्ठा वालावलकर, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी पैशातून मतदारांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सोशल माध्यमांवरील प्रचार उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याचे दर ठरविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाभरातील निवडणुकांसाठी लोकसभा निवडणुकांमध्ये वापरण्यात आलेला ३० हजार कर्मचाºयांचा प्रशिक्षित स्टाफच वापरला जाणार आहे.२४ सप्टेंबरपर्यंत नाव बदल शक्यअजूनदेखील काही उमेदवार किंवा नागरिकांनी मतदार यादीतील नावात दोष असल्यास २४ सप्टेंबरपर्यंत नावात बदल करणे शक्य असल्याची त्यांनी नोंद घ्यावी. मात्र, ज्या मतदारांची नावे १ जानेवारी २०१९ च्या पूर्वी नोंदवली गेली आहेत, त्यांनाच मतदान करण्याचा अधिकार राहणार असल्याचेही मांढरे यांनी सांगितले. तसेच ज्या मतदारांना काही माहिती मिळवायची किंवा तक्रार करायची असल्यास त्यांनी १९५० या क्रमांकावर संपर्क साधावा. इंटरनेटवर सी व्हिजील किंवा सुविधा साइटवरदेखील नागरिकांना सर्व माहिती उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाºयांनी नमूद केले.
प्रचारातील सोशल मीडियाच्या खर्चावरही प्रशासनाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 2:04 AM
व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, मेसेज यांसह सर्व प्रकारच्या समाजमाध्यमांवर केल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारातील खर्चावरही यंदाच्या निवडणुकीपासून प्रशासन करडी नजर ठेवणार आहे. त्यासाठी या माध्यमांवरील देखरेखीसाठी स्वतंत्र पथक तर खर्चाच्या दरांचा स्वतंत्र तक्तादेखील बनविण्यात येणार आहे. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ठळक मुद्देयंत्रणा सज्ज । मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उपाययोजना