लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : बागलाण तालुक्यात पूर नियंत्रण उपाययोजना या संदर्भात प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ असून दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन कागदावरच असल्यामुळे तो निव्वळ एक फार्स असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापनच एक आपत्ती असून जनतेची सुरक्षितता आज तरी रामभरोसे असल्याचे चित्र आहे.
बागलाण तालुक्यातील मोसम आणि आरम या दोन प्रमुख नद्या आहेत . तसेच हत्ती, कान्हेरी, करंजाडी, सुकेड, दोध्याड या उप नद्या आहेत . या नद्यांवर हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पासह दसाणे, पठावे, जाखोड, दोधेश्वर हे लघु प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये पावसाळ्यात मोसम आणि आरम या नद्यांना पूर येऊन धोक्याची पातळी गाठत असतात . याचा सर्वाधिक धोका नदी काठाच्या गावांना अधिक राहिला आहे . प्रशासन जरी पूर नियंत्रण उपाययोजनांबाबत अनभिज्ञ असले तरी अंतापूर ,नामपूर ,वाघळे या गावांचा काही भाग पूर रेषेत आहे . अंतापूर येथील आदिवासी वस्ती नदी काठालगतच वसलेली आहे . पूर संरक्षण भिंत नसल्यामुळे आणि पुनर्वसनाबाबत प्रशासन उदासीन असल्यामुळे त्यांची सुरक्षितता आज तरी रामभरोसे आहे . वाघळे येथील काही घरांची अवस्था अंतापूरपेक्षा वेगळी नाही. नामपूरची बाजारपेठ देखील पूररेषेत असून पावसाळयात त्यांना जीव मुठीत धरूनच राहावे लागते .
नाल्यात तीनशेहून अधिक आदिवासी वस्ती करून राहतात . यांचे देखील पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हाल होतात . सुकेड नदीला पूर आल्यानंतर अक्षरशः प्रत्येक घर पाण्यात असते. तरीदेखील पालिका प्रशासन त्यांना सुरक्षित जागा देऊन हक्काची घरे देऊ शकली नाही . इन्फो... शासकीय इमारत पूर रेषेत
सटाणा पालिकेने अग्निशमन कार्यालयाची इमारत चक्क पूर रेषेत बांधण्यात आली आहे. याबाबत तत्कालीन नगराध्यक्षांनी आक्षेप देखील घेतला होता. मात्र पालिका प्रशासनाने विरोधाला न जुमानता सुकेड नदीत अग्निशमन कार्यालय इमारत उभारण्यात आली आहे. इन्फो... नऊ पथके तयार
महसूल विभागाने आपत्ती व्यवस्थापन केले असून त्यासाठी नऊ पथके तयार केली आहे . या पथकांनी आपल्या भागातील दैनंदिन पावसाची माहिती, नैसर्गिक आपत्तीबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांना सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
फोटो - २४ सटाणा १
सटाणा शहरातील सुकेड नदीत वसलेली आदिवासी वस्ती व अग्निशमन कार्यालय.
===Photopath===
240621\063124nsk_42_24062021_13.jpg
===Caption===
सटाणा शहरातील सुकेड नदीत वसलेली आदिवासी वस्ती व अग्निशमन कार्यालय.