पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्या पिंपळगाव बसवंत मध्ये आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये चर्चा आणि नाराजीचा सूर येवू लागला आहे.
सामान्य माणसाच्या घरात कोरोना रु ग्ण आढळताच काही तासातच प्रशासन हजर होऊन तेथीलक्षेत्र कोरोना प्रतिबंध करतात व सदर कुटुंबातील सदस्य निगेटिव्ह असतांना त्यांच जगणही मुश्कील करतात परंतु पिंपळगाव शहरातील नामांकित खाजगी इस्पितळाच्या डॉक्टरचे आई वडील तथा निवृत्त महसुल विभागाचे प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या पत्नीचा गेल्या आठ दिवसापूर्वी कोरोना अहवाल बाधीत आला, पण त्यांचे घर आठ दिवसांनी प्रतिबंध क्षेत्र घोषित तर इस्पितळाकडे दुर्लक्ष करत बनवाबनवी केली जाते मग सामान्य नागरिकांना व निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेगळे नियम लावून असा दुजाभाव का.? असा पिंपळगावच्याकरांना पडला आहे.या प्रकारामुळे प्रशासनाकडून होणारी प्रतिबंधित क्षेत्राची बनवाबनवी व दिरंगाई उघड झाली याबाबत नेमकं काय गौडबंगाल आहे हे अजूनही स्पष्ट न झाल्याने तालुक्यात आरोग्य विभाग व प्रशासनाच्या डोळेझाकपणा कारभाराची चर्चा चांगलीच रंगली आहे. पण कृष्णजन्माष्ठमीच्या पूर्वसंध्येला रंगलेला हा किस्सा पिंपळगावकर दिवसभर एकमेकांना सांगत होते.चौकट...कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आताजरी २५ मीटरचा निकष आला, तरी सुरवातीला शंभर मीटर परिसरातील सामान्य लोकांचे सरकारी नियमावर बोट ठेऊन नागरिकांचे जगणे मुस्किल केले जात होते. एरवी कडक स्वभावाच्या प्रशासनाला आणि संबंधित प्रत्येक खात्याला आपल्या शिस्तीचा भडगा दाखवणार्या प्रांतअधिकार्यांची वचक ही प्रत्येकानेच पाहिली असे असतांना नेमक या दवाखान्यात जेव्हा कोविड बाधीत डॉक्टरचेच आई वडील बाधीत आढळून येतात तेव्हा मात्र प्रशासनाने डब्यू एचओ च्या नियमावर बोट का ठेवले नाही. असा सवाल हजारो पिंपळगावकरांनी विचारला आहे.आठ दिवसानंतर लावला प्रतिबंधक क्षेत्राचा फलक तोही दुसºयाच ठिकाणीपिंपळगाव बसवंत शहरात कोरोनाचा पादुर्भाव झाल्याने रु ग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे परंतु बनवाबनवीचे खेळणारे आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासन अधिकारी प्रतिबंधित क्षेत्राचा फलक आठ दिवसांनीआणि तोही भलत्याच डिकाणी का लावतात हा प्रश्न अद्यापही अनूत्तरीत आहे.