शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

महासभेची ध्वनीफीत देण्यास प्रशासनाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:28 AM

नुकत्याच झालेल्या महासभेत साथरोगप्रश्नी प्रशासनाची बाजू घेत गुणगान गाणाºया भाजपा नगरसेवकांच्या भाषणाची ध्वनीफीत शिवसेनेने नगरसचिव विभागाकडे मागितली होती. परंतु, नगरसचिव विभागाने सदर ध्वनीफीत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपा नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात वाजविण्याचे शिवसेनेचे मनसुबे फोल ठरले आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपाकडूनच नगरसचिव विभागावर याबाबत दबाव आणला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

नाशिक : नुकत्याच झालेल्या महासभेत साथरोगप्रश्नी प्रशासनाची बाजू घेत गुणगान गाणाºया भाजपा नगरसेवकांच्या भाषणाची ध्वनीफीत शिवसेनेने नगरसचिव विभागाकडे मागितली होती. परंतु, नगरसचिव विभागाने सदर ध्वनीफीत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपा नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात वाजविण्याचे शिवसेनेचे मनसुबे फोल ठरले आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपाकडूनच नगरसचिव विभागावर याबाबत दबाव आणला गेल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.  बुधवार, दि. २० सप्टेंबरला झालेल्या महापालिकेच्या झालेल्या महासभेत विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी डेंग्यू व स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रभावाकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. मात्र, सेनेला काउंटर करण्यासाठी लगोलग भाजपा गटनेते संभाजी मोरुस्कर यांनीही लक्षवेधी सादर करत शहरात साथरोगाचा प्रभाग गेल्यावर्षीच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे सांगत प्रशासनाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले होते. त्यामुळे सात तास चाललेल्या महासभेत शिवसेना प्रशासनावर तुटून पडली असताना भाजपाचे एकेक नगरसेवक प्रशासनातील अधिकाºयांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रशंसोद्गार काढत होते. महासभेत साथरोगप्रश्नी शिवसेनेने मांडलेल्या लक्षवेधीवर भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला शाबासकीची थाप देत अस्वच्छतेबाबत नागरिकांनाच दोषी ठरविले होते. महासभेत ज्या-ज्या भाजपा नगरसेवकांनी नागरिकांवर प्रहार केले त्या भाषणाची ध्वनीफीत संबंधित नगरसेवकांच्या प्रभागात नागरिकांना ऐकवण्याचे शिवसेनेने ठरविले होते. त्यासाठी सेनेने नगरसचिव विभागाकडून महासभेच्या कामकाजाची ध्वनीफीतही मागविली होती. मात्र, नगरसचिव विभागाने अशाप्रकारे ध्वनीफीत देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. सदर ध्वनीफीत ही प्रशासनाच्या कामकाजासाठी असते. त्यामुळे ती अन्य कुणाला देण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही नगरसचिव विभागाने म्हटले आहे. नगरसचिव विभागाने ध्वनीफीत देण्यास नकार दिल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. मात्र, यामुळे शिवसेनेकडून आणखी आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.नगरसचिवांवर भाजपाचा दबावमहासभेत नागरीहिताविरोधी घेतलेले आपले कर्तृत्व जनतेसमोर येऊ नये यासाठी सत्ताधारी भाजपाने नगरसचिव विभागावर ध्वनीफित देऊ नये यासाठी दबाव आणल्याचा आरोप विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केला आहे. नगरसचिव हे महापौरांच्या अधिपत्याखाली काम करत असतात. ध्वनीफित देणार नसेल तर इतिवृत्त तर आमच्या हाती येणारच आहे आणि तो आमचा हक्कही आहे. सदर इतिवृत्तातील ठळक मुद्द्यांचे तसेच वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांचे कात्रण यांचे जाहीर फलक संबंधित भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात झळकविले जाणार असल्याचेही बोरस्ते यांनी सांगितले.