शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

रस्ते विकास प्रस्तावाबाबत प्रशासन संशयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 1:13 AM

महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद नसताना वजा तरतुदीने ईआरपी करून ३६५ कोटींच्या रस्ते विकास प्रस्तावाच्या मंजुरीबाबत माजी विरोधी पक्षनेता व शिवसेनेने नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी एका पत्रान्वये आक्षेप घेतला असून, प्रशासनाच्या संशयास्पद कृतीकडे लक्ष वेधले आहे.

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद नसताना वजा तरतुदीने ईआरपी करून ३६५ कोटींच्या रस्ते विकास प्रस्तावाच्या मंजुरीबाबत माजी विरोधी पक्षनेता व शिवसेनेने नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी एका पत्रान्वये आक्षेप घेतला असून, प्रशासनाच्या संशयास्पद कृतीकडे लक्ष वेधले आहे. बडगुजर यांनी मुख्य लेखापरीक्षकांना पत्र देऊन सदर आक्षेप नोंदवला आहे. बडगुजर यांनी म्हटले आहे, आयुक्तांनी रस्ते बांधणीसाठी अंदाजपत्रकात ९४ कोटींची तरतूद उपलब्ध करून दिलेली असताना त्यामध्ये वजा तरतुदीने ईआरपी करून ३६५ कोटींचे प्रस्ताव बेकायदेशीरपणे अधिनियमांचा भंग करून मंजूर करण्यात आले आहेत. मनपाचे स्वत:चे उत्पन्न ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत ६५२ कोटी रुपये इतके झालेले आहे, तर खर्च ५७७ कोटी इतका झालेला आहे. मनपाने आतापर्यंत भांडवली कामांना दिलेल्या मंजुरीनुसार ८०९ कोटींची कामे ३० सप्टेंबरअखेर मंजूर केलेली आहेत. या भांडवली कामांचे ८०९ कोटींचे दायित्व ३१ मार्च २०१८पर्यंत खर्च होणार आहे. यात महसुली कामाचा कुठलाही समावेश नाही.  मनपाचे महसुली दायित्व ६५० कोटी इतके असून, ते सुद्धा ३१ मार्च २०१८ पर्यंत खर्च होणार आहे. मनपाचा भांडवली व महसुली खर्च या दोन्हींची बेरीज केल्यास १४५९ कोटी रुपयांचा खर्च ३१ मार्च २०१८ अखेरपर्यंत होणार आहे. मनपावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर दायित्व असतानादेखील वजा तरतुदीने ईआरपी करून नवीन प्रस्तावास मंजुरी देणे चुकीचे आहे. मनपाने कर्जरोखे घेतले असून, त्याची व्याजाची रक्कम ३८ कोटी रुपये भरावी लागणार आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या योजनासाठी मनपाचा हिस्सा म्हणून बंधनात्मक खर्चही मोजावा लागणार आहे. कर्मचाºयांच्या पगारासाठी ३८ टक्के रक्कम राखीव ठेवणे आवश्यक आहे. अशा स्थितीत वजा तरतुदीने प्रस्ताव मंजूर करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. भविष्यात त्यामुळे आकस्मिक खर्च भागविणेदेखील मुश्किल बनणार असल्याचा इशारा बडगुजर यांनी दिला आहे.अधिकाºयांचे संगनमतबडगुजर यांनी याबाबत अधिकाºयांना दोषी धरले असून आयुक्तांना अंधारात ठेवत मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखापरीक्षक व शहर अभियंता यांनी संगनमताने आयुक्तांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. बांधकाम विभागाचे ३६५ कोटींचे रस्ते बांधणीचा प्रस्ताव बेकायदेशीरपणे विनाचर्चा मंजूर करण्यामागे नेमके काय गौडबंगाल आहे, असा प्रश्नही बडगुजर यांनी उपस्थित केला आहे.