लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.२८) भगूर येथे आयोजित सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहे. या दौऱ्यांमुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाल्याचे चित्र आहे. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावरकर दर्शन या कार्यक्र माच्या माध्यमातून स्मारकाच्या दर्शनासाठी पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार असल्याचे समजते. याबाबत अधिकृत दौरा आला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यानिमित्ताने सकाळी ८ ते ९.३० दरम्यान शतजन्म शोधितांना यावर आधारित सावरकरांच्या गीतांचा कार्यक्र म होईल. ९ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावरकर जन्मस्थळावर अग्निकुंड प्रज्वलित करण्यात येणार आहे. ९. ४५ वाजता मुख्यमंत्र्यांचे सभास्थळी आगमन होणार असून, यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्र म सादर करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना मार्गदर्शन करतील. ११ वाजता कार्यक्र माचा समारोप होणार आहे. यानंतर मुख्यमंत्री नाशिकरोड येथील पुरुषोत्तम हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्र माला उपस्थित राहणार आहेत. यानंतर ते नाशिक महापालिकेत भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दुपारी १२ वाजता पोलीस परेड मैदान येथून ते हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील. सावरकर जयंतीनिमित्त कालिदास कलामंदिर येथे सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ७ वाजता आयोजित या समारोप सोहळ्यास केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ
By admin | Published: May 26, 2017 12:53 AM