नाशिक : जायकवाडी धरणासाठी समन्यायी पाणीवाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाला मंगळवारी प्राप्त झाल्यानंतर पाटबंधारे अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. एकीकडे राजकीय पक्षांनी दिलेले आंदोलनाचे इशारे व पाण्याच्या प्रश्नावर शेतकºयांच्या संतप्त भावना पाहता, पाणी सोडताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करून पोलिसांना बंदोबस्तासाठी पत्र देण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्णातून जायकवाडी धरणासाठी दोन वर्षांपूर्वी पाणी सोडल्यानंतर त्याचा सर्वपक्षीय तीव्र उद्रेक निर्माण झाला होता. ठिकठिकाणी शेतकºयांची आंदोलने करून जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या समक्ष गोंधळ घातल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत यंदा जिल्ह्णात ८३ टक्के पाऊस होऊन धरणात जेमतेम ७७ टक्के साठा आहे. काही तालुक्यांमध्ये आत्तापासूनच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, उन्हाळ्यात यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्णातील धरणांतील पाणी जायकवाडीला सोडण्याचा मुद्दा चर्चेत येताच, खुद्द सत्ताधारी भाजपातूनच त्याची पहिली प्रतिक्रिया उमटली तर शिवसेना, राष्टÑवादी, कॉँग्रेस, मनसेने पाणी सोडण्याला कडाडून विरोध दर्शविला आहे. शेतकरी संघटना, पाणीवापर संस्था, शेतकºयांनी पाणी सोडण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची धमकी दिली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने गंगापूर धरण समूहातून .६० टीएमसी, दारणा धरण समूहातून २.०४ टीएमसी व पालखेड समूहातून .६० टीएमसी पाणी येत्या ३१ आॅक्टोबरच्या आत पाणी सोडण्याचे आदेश दिले असल्यामुळे जिल्हा प्रशासन व पाटबंधारे खात्याची धावपळ सुरू झाली आहे.बुधवारी जिल्हाधिकाºयांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली तसेच पाणी सोडण्यापूर्वी व सोडल्यावर करावयाच्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.वीजपुरवठा खंडितसध्या दिवाळी सणाचा हंगाम असून, पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आहे. अशा परिस्थितीत पाण्यावरून नागरिकांच्या भावनांचा विचार केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सणासुदीच्या दिवसात सरकारला ते परवडणारे नाही. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त घ्यावा लागणार असल्याने तसे पत्र बुधवारी ग्रामीण पोलिसांना देण्यात आले. त्याचबरोबर नदीपात्रात असलेल्या बंधाºयांच्या फळ्या काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, काही ठिकाणच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत. नदीवाटे वहन होणाºया या पाण्याची वाटेत चोरी रोखण्यासाठी नदीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, त्याबाबतचे पत्र वीज कंपनीला देण्यात आले.
पाणी सोडण्यासाठी प्रशासनाची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:57 AM