येवला बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपल्याने दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पालकमंत्री भुजबळ यांनी प्रशासकीय मंडळाची शिफारस केली होती. त्यानुसार १८ सदस्यांचे प्रशासक मंडळ अस्तित्वात आले हाेते. मात्र, शासकीय-प्रशासकीय पूर्तता पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि.८) रोजी जिल्हा उपनिबंधक खरे यांनी नियुक्ती आदेश जारी केले आहेत.
प्रशासक मंडळात मुख्य प्रशासक म्हणून वसंत पवार असून, मंडळात किसनराव धनगे, विश्वास आहेर, मधुकर साळवे, समीर देशमुख, ज्ञानेश्वर दराडे, शरद शिंदे, मायावती पगारे, प्रेमलता आट्टल, भानुदास जाधव, बाळासाहेब आवारे, राजेंद्र शेलार, सुवर्णा सोनवणे, गणपत भवर, जयाजी शिंदे, वाल्मीक गोरे, चंद्रकांत शिंदे, साहेबराव आहेर यांचा समावेश आहे.
सदर प्रशासक मंडळाला तात्काळ पदभार घेऊन अहवाल पाठविण्याच्या सूचनाही जिल्हा उपनिबंधक खरे यांनी केल्या आहेत. तसेच येत्या सहा महिन्यात बाजार समिती संचालक मंडळ निवडणुका घेणेबाबत कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना सदर आदेशात करण्यात आली आहे.