येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गत सुरू असलेली शासकीय मका खरेदी योजना मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध नसल्याने तूर्त बंद झाली होती. याबाबतचे वृत्त १५ जानेवारी रोजी ‘लोकमत’मध्ये ‘येवला मका खरेदी तूर्त बंद’ अशा मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते. प्रशासनाने त्याची दखल घेत, मका उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी अंगणगाव शिवारातील गोशाळा पांजरापोळ यांचे गुदाम मका खरेदीसाठी वापरावे, अशा आशयाचे पत्र येवला तालुका खरेदी - विक्री संघाच्या व्यवस्थापकांना दिले आहे. त्यामुळे गुरुवारपासून (दि. १८) पुन्हा एकदा मका खरेदीला सुरु वात होणार आहे. आतपर्यंत खरेदी झालेल्या आॅनलाइन नोंदणीच्या आधारे पुढील शेतकºयांनी माल आणण्याचे आवाहन केले आहे.मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध झाल्याने ज्या मका उत्पादक शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोशाळा पांजरापोळ यांच्या गुदामाची क्षमता पाच हजार क्विंटल आहे. ४ डिसेंबर २०१७ ला सुरू झालेल्या शासकीय मका खरेदी योजनेंतर्गत एमआयटी कॉलेज, धानोरा येथील गुदामात ६५०९ क्विंटल, तर येवला येथील एसएनडी कॉलेजच्या गुदामात १०९९४.५० क्विंटल अशी एकूण १२ जानेवारी २०१७ अखेर १७५०३.५० क्विंटलची मका खरेदी झालेली आहे. दोन्हीही गुदाम पूर्ण क्षमतेने भरल्याने तहसील कार्यालयाकडून गुदाम उपलब्ध होईपर्यंत खरेदी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. १७५९ आॅनलाइन नोंदणीधारक शेतकºयांपैकी ४३५ क्रमांकापर्यंतच्या शेतकºयांना माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना दिल्या असून, पैकी ३७५ शेतकºयांनी मका विक्री केली आहे. आॅनलाइन नोंदणीधारक शेतकरी असून, संघ कार्यालयात प्रसिद्ध यादीनुसार अ.नं. ४५५ पासून पुढील शेतकºयांना मका विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या शेतकºयांनी खरेदी-विक्री संघाकडून मॅसेज येऊनही अद्याप मका विक्रीसाठी आणला नाही, अशा शेतकºयांनी खरेदी - विक्री संघ कार्यालयात संपर्क करावा. अशा शिल्लक शेतकºयांची मका दर शनिवारी खरेदी केला जाणार आहे, तर रखडलेली मका खरेदी केवळ तीन दिवसातच सुरू होणार आहे.उत्पादकांकडून मागणी मका नोंदणीधारक शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने मका साठवणूक गुदामाअभावी मका खरेदी केंद्र बंद होऊ नये म्हणून येवला तहसील कार्यालयाने एमआयटी कॉलेज, धानोरा, कृउबा उपबाजार अंदरसूल व पाटोदा व तालुक्यातील ग्रामीण भागातील गुदाम उपलब्ध करून देऊन मका खरेदी केंद्र विनाखंडित सुरू ठेवावे, अशी मागणी मका उत्पादक शेतकरीवर्गाकडून होत आहे.
प्रशासनाचे पत्र : गोशाळा पांजरापोळचे गुदाम उपलब्ध गुरुवारपासून मका खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:11 AM
येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गत सुरू असलेली शासकीय मका खरेदी योजना मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध नसल्याने तूर्त बंद झाली होती.
ठळक मुद्देमका उत्पादक शेतकºयांना दिलासाशेतकºयांनी माल आणण्याचे आवाहन