जानोरी : दिंडोरी तालुक्यातील मुदत संपुष्टात आलेल्या ६० पैकी ४४ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून पंचायत समित्यातील विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ४४ ग्रामपंचायतीची मुदत दि.१३ जुलैपूर्वी संपलेली असल्याने प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी यांची नेमणूक करण्यातआली आहे.तसेच दि. १३ जुलैनंतर मुदत संपलेल्या १६ ग्रामपंचायतींवर गावातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड केली जाणार आहे.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नव्याने काढण्यात आलेल्या शासनआदेशानुसारराज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर यापुढे प्रशासक म्हणून शासकीय अधिकारी किंवा कर्मचाºयाची नेमणूक न करता गावातीलच योग्य व्यक्तीची निवड केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १६ ग्रामपंचायतींवर गावातील योग्य व्यक्तीच्या नावाची आमदार नरहरी झीरवाळ हे पालक मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे शिफारस करणार आहेत. त्यामुळे मुदत संपलेल्या गावातील प्रत्येक पक्षातील व्यक्ती आपल्या पक्षाचा माणूस ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमला जावा यासाठी प्रयत्न करीत आहे.
दिंडोरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींवर प्रशासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 5:38 PM