शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

५१ ग्रामपालिकेवर प्रशासक नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 5:20 PM

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात यावर्षी ५७ ग्रामपंचायतीच्या मुदती संपुष्टात येणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. त्यात तिस-या संभाव्य लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणुकांबाबत अनिश्चितता असल्याने तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ५७ पैकी ५१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. उर्वरीत सहा ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०२१ मध्ये संपणार असल्याने त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले नाहीत.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर तालुका : मुदत संपल्याने जि.प.ची कार्यवाही

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात यावर्षी ५७ ग्रामपंचायतीच्या मुदती संपुष्टात येणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. त्यात तिस-या संभाव्य लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निवडणुकांबाबत अनिश्चितता असल्याने तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ५७ पैकी ५१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. उर्वरीत सहा ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०२१ मध्ये संपणार असल्याने त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले नाहीत.तालुक्यात ८४ ग्रामपंचायती असुन जानेवारी-फेब्रुवारी मध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या, त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. आता ५७ ग्रामपंचायती शिल्लक असून दि. १३ ते २१ जुलै दरम्यान ५१ ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार असल्याने या ग्रामपंचायतीं वर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी विविध खात्यांचे विस्तार अधिकारी यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती केली आहे. त्यामध्ये, शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर सुर्यवंशी - अस्वली हर्ष, सामुंडी, पेगलवाडी, त्र्यंबक व टाकेहर्ष, कृषीविस्तार अधिकारी प्रतिभा वसावे - ब्राम्हणवाडे, अंबई, अंबोली, कृषीविस्तार अधिकारी स्वाती भिसे - कोणे, गणेशगाव (वा), वेळे, झारवड खुर्द, धुमोडी, शिरसगाव त्र्यंबक, सहायक पशुधन विकास अधिकारी भगवंत गांगुर्डे-मुरंबी, देवळा (आ), गावठा, विस्तार अधिकारी सांख्यिकी संदीप चौधरी -तोरंगण (ह), दलपतपुर व सापतपाली, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र बोडके - ठाणापाडा, कोटंबी, कळमुस्ते, विस्तार अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प राजेंद्र शिलावट- वेळुंजे, नांदगाव, कोहळी, वरसविहीर, खरवळ, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बाळु पवार - अंजनेरी, बेझे, पिंप्री त्र्यंबक, मुळेगाव, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश्वर आहेर - चिंचवड, जातेगाव (बु), शिक्षण विस्तार अधिकारी मोठाभाउ चव्हाण - खैरायपाली, चिंचओहळ व देवडोंगरा, शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद चव्हाण- पिंपळद, त्र्यंबक तळेगाव, त्र्यंबक काचुर्ली, कळमुस्ते त्र्यंबक, विस्तार अधिकारी शुभारंभ मनाई- रोहीले, हिरव, तळवाडे त्र्यंबक, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दगडू राठोड- ओझरखेड, खडकओहळ, रायते, गडदवणे, शिरसगाव (ह), हातलोंढी तर कृषी अधिकारी सुनील विटनोर - मुलवड, भागओहळ, बेरवळ याप्रमाणे प्रशासकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.निवडणुका पुढील वर्षीच?निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी मतदार याद्या अद्ययावत करणे, प्रभाग रचना, मतदान केंद्रे निश्चित करणे आदी कामांसाठी किमान २-३ महिन्यांचा कालावधी लागेल. या कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तिसरी लाट डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत राहील, असे सांगितले जात आहे. तोपर्यंत निवडणुकीची पुर्व तयारी करुन ठेवता येईल. त्यामुळे निवडणुका होण्यास नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार