त्र्यंबकेश्वर : तालुक्यात यावर्षी ५७ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. त्यात संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे निवडणुकांबाबत अनिश्चितता असल्याने ताेपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ५७ पैकी ५१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. उर्वरित सहा ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर २०२१ मध्ये संपणार असल्याने त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केले नाहीत.
तालुक्यात ८४ ग्रामपंचायती असून, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे, त्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. आता ५७ ग्रामपंचायती शिल्लक असून, दि. १३ ते २१ जुलैदरम्यान ५१ ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने या ग्रामपंचायतींवर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी विविध खात्यांच्या विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामध्ये, शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर सूर्यवंशी- अस्वली हर्ष, सामुंडी, पेगलवाडी, त्र्यंबक व टाकेहर्ष, कृषी विस्तार अधिकारी प्रतिभा वसावे - ब्राह्मणवाडे, अंबई, अंबोली, कृषी विस्तार अधिकारी स्वाती भिसे - कोणे, गणेशगाव (वा.), वेळे, झारवड खुर्द, धुमोडी, शिरसगाव त्र्यंबक, सहायक पशुधन विकास अधिकारी भगवंत गांगुर्डे-मुरंबी, देवळा (आ.), गावठा, विस्तार अधिकारी सांख्यिकी संदीप चौधरी -
तोरंगण (ह.), दलपतपूर व सापतपाली, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र बोडके - ठाणापाडा, कोटंबी, कळमुस्ते, विस्तार अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प राजेंद्र शिलावट- वेळुंजे, नांदगाव, कोहळी, वरसविहीर, खरवळ, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बाळू पवार - अंजनेरी, बेझे, पिंप्री त्र्यंबक, मुळेगाव, शिक्षण विस्तार अधिकारी राजेश्वर आहेर - चिंचवड, जातेगाव (बु.), शिक्षण विस्तार अधिकारी मोठाभाऊ चव्हाण - खैरायपाली, चिंचओहळ व देवडोंगरा, शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद चव्हाण- पिंपळद, त्र्यंबक तळेगाव, त्र्यंबक काचुर्ली, कळमुस्ते त्र्यंबक, विस्तार अधिकारी शुभारंभ मनाई- रोहिले, हिरव, तळवाडे त्र्यंबक, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दगडू राठोड- ओझरखेड, खडकओहळ, रायते, गडदवणे, शिरसगाव (ह.), हातलोंढी, तर कृषी अधिकारी सुनील विटनोर - मुलवड, भागओहळ, बेरवळ याप्रमाणे प्रशासकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
इन्फो
निवडणुका पुढील वर्षीच?
निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी मतदार याद्या अद्ययावत करणे, प्रभाग रचना, मतदान केंद्रे निश्चित करणे आदी कामांसाठी किमान २-३ महिन्यांचा कालावधी लागेल. या कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तिसरी लाट डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत राहील, असे सांगितले जात आहे. तोपर्यंत निवडणुकीची पूर्वतयारी करून ठेवता येईल. त्यामुळे निवडणुका होण्यास नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.