सातपूर : सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्र व्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नाही, अशी स्पष्टोक्ती नामको बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी दिली आहे. नामको बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आर्थिक वर्षाच्या अहवालाची माहिती देताना भोरिया यांनी प्रशासकीय काळातील बँकेचा चढता आलेख सादर करताना सांगितले की, संचालक मंडळाच्या कार्यकाळापेक्षा प्रशासकीय काळात म्हणजेच २०१३ नंतर आतापर्यंत सर्वाधिक नफा (३५ कोटी रु पयांपेक्षा अधिक नफा) बँकेला झालेला आहे. त्यामुळे सभासदांना १५ टक्के लाभांश आणि सेवकांना २० टक्के बोनस देण्याची तरतूद केली आहे. २०१३ साली अवघे ३६ कोटी रु पयांचे भागभांडवल आता ५० कोटी रु पयांवर पोहोचले आहे. २०० कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षणासाठी दिल्लीला पाठविण्यात आलेले आहे. त्यामुळे बँकेच्या कामकाजात सुसूत्रता येत आहे. मात्र प्रशासकीय काळात अनेक कारणांमुळे १०.५९ टक्के एनपीए वाढला असला तरी त्यास प्रशासक जबाबदार नाही. एनपीए कमी करण्यासाठी त्या त्या शाखेला उद्दिष्टे देण्यात आलेले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, प्रशासक हटविणे माझ्या मतावर नाही. मात्र सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्रव्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रशासक हटविण्याबाबत शहरात बैठका होत असल्याची माहिती आपल्याकडे नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘...तोपर्यंत प्रशासक हटणार नाही’ नामको प्रशासक भोरिया : आर्थिक वर्षाच्या अहवालाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 1:03 AM
सातपूर : सर्वसाधारण सभेतील ठरावांचा इतिवृत्तांत आणि पत्र व्यवहार रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत रिझर्व्ह बँकेकडून काही निर्देश येत नाहीत तोपर्यंत प्रशासक हटणार नाही.
ठळक मुद्देनामको बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात पत्रकार परिषद२०० कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षणासाठी दिल्लीला पाठविण्यात आले