नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कामकाजात यामागे काय झाले त्यापेक्षा आता पुन्हा बॅँकेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सभासद, शेतकºयांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी कामकाजात सुधारणा घडवून प्राधान्याने जिल्हा बॅँकेची थकीत वसुली करावी, अशी तंबी जिल्हा बॅँकेचे प्रशासक तथा विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी दिली आहे.शनिवारी जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर भालेराव यांनी प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारली व काहीकाळ बॅँकेत थांबल्यानंतर ते रवाना झाले होते. सोमवारी बॅँकेचे कामकाज सुरू झाल्यानंतर छोटेखानी समारंभात भालेराव यांनी बॅँकेचे अधिकारी व कर्मचाºयांशी संवाद साधला. जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामकाजामुळे बॅँकेवर ही परिस्थिती ओढविली व परिणामी संस्थेवर प्रशासक नेमण्याचा कटू निर्णय रिझर्व्ह बॅँकेला घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगून, बॅँकेचे कामकाज अधिकाधिक पारदर्शी कसे होईल याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. बॅँकेची आर्थिक परिस्थिती, देणी याचा विचार करता, बॅँकेने यापूर्वी वाटलेले कर्जवसुली कशी होईल याकडे सर्वांनी लक्ष घालावे, साधारणत: २७०० कोटी रुपये विविध माध्यमांतून येणे बाकी असून, शेतकरी कर्जमाफीतून बॅँकेला ५०० ते ६०० कोटी रुपये मिळतील, परंतु ते बॅँकेचे आर्थिक व्यवहार सुरुळीत करण्यासाठी पुरेसे नाहीत, त्यामुळे उर्वरित २२०० कोटी रुपयांची वसुली करण्याची जबाबदारी सर्व कर्मचारी, अधिकाºयांची असून, प्राधान्याने ते काम हाती घ्यावे लागेल अशी तंबीच त्यांनी भरली. अशी वसुली करताना कोणाच्या दबावाला अथवा राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता निर्भयपणे कामकाज करा, असा सल्ला देतानाच स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी व बॅँकेचे भवितव्य कायम ठेवण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी ते घ्यावे लागतील असे सांगून त्यांनी भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले. यावेळी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र बकाल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बॅँकेच्या कर्ज वसुलीसाठी प्रशासकाची तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:42 AM
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कामकाजात यामागे काय झाले त्यापेक्षा आता पुन्हा बॅँकेला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सभासद, शेतकºयांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी कामकाजात सुधारणा घडवून प्राधान्याने जिल्हा बॅँकेची थकीत वसुली करावी, अशी तंबी जिल्हा बॅँकेचे प्रशासक तथा विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी दिली आहे.
ठळक मुद्देजिल्हा बॅँक : विभागीय निबंधकांनी साधला संवादप्राधान्याने जिल्हा बॅँकेची थकीत वसुली