नाशिक : शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनानेही आता कडक पावले उचलली असून, सकाळी साडेदहा वाजता मुख्य प्रवेशद्वारासह अन्य लहान दरवाजेही बंद करण्यात आली असून, प्रत्येकाला कामाशिवाय आत सोडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या संदर्भात कालच जिल्हा परिषद अध्यक्षांनी प्रशासनाला कडक उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार मंगळवार सकाळपासूनच मास्क असल्याशिवाय कोणालाही आत प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे कर्मचारी व अधिकारी वगळता अन्य व्यक्तींना प्रवेशद्वारावरच कामाचे स्वरूप व कोणाकडे काम आहे याची विचारणा करून संबंधितांशी संपर्क साधून आत मध्ये सोडण्यात आले. कोणतेही काम नसलेल्यांना मात्र प्रवेश नाकारण्यात आला. याच बरोबर प्रत्येक विभागप्रमुखांना अनावश्यक गर्दी टाळण्याच्या त्याच बरोबर कोरोना उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील काही विभागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यामुळे सर्वच विभागांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. कर्मचाऱ्यांनाही अभ्यागतांशी थेट संपर्क साधण्यास मज्जाव करण्यात आला असून, कार्यालयात बसतांनाही एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली. ५० टक्के उपस्थितीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शासकीय कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेला सायंकाळी उशीरापर्यंत याबाबतचे आदेश प्राप्त झालेेले नव्हते. आदेश प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ओळखपत्र पाहूनच जिल्हा परिषदेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 1:26 AM
शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनानेही आता कडक पावले उचलली असून, सकाळी साडेदहा वाजता मुख्य प्रवेशद्वारासह अन्य लहान दरवाजेही बंद करण्यात आली असून, प्रत्येकाला कामाशिवाय आत सोडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
ठळक मुद्देमुख्य प्रवेशद्वार अभ्यागतांसाठी बंद