एकलहरे : संघटना आणि प्रशासनातील परस्पर समन्वयातून कोणत्याही कंपनीची प्रगती होते. महावितरण कंपनीनेही कामगार व अधिकाऱ्यांच्या सहकार्यानेच आतापर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. यापुढे हा समन्वय अधिक वृद्धिंगत करून यशस्वी घोडदौड कायम ठेवण्यात येईल, असे प्रतिपादन महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे प्रभारी कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे यांनी केले. महावितरणमधील राज्यस्तरीय कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसाठी एकलहरे प्रशिक्षण केंद्रात आयोजित एकदिवशीय कार्यशाळेत बोलताना येरमे म्हणाले की, प्रशासन आणि संघटनांमधील परस्पर सहकार्य आणखी वृद्धिंगत व्हावे व सकारात्मक दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत ७१ हजार कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले असून यातून कर्मचाºयांमधील गुणवत्ता विकसित करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. तसेच दैनंदिन कामकाजात सुरक्षेला अधिक महत्व देण्याबाबत जागृती केली जात असल्याचे येरमे यांनी सांगितले. मुख्य प्रशिक्षक डॉ. रगीब यांनी वैयिक्तक, सामाजिक आणि संस्थात्मक स्तरावर होत असलेले बदल, या अपरिहार्य बदलांचा स्वीकार करून कामात आनंद कसा मिळवावा याबाबत मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक भरत जाडकर, मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, प्रभारी मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, प्रशिक्षक डॉ. रगीब अहमद अब्दुल नबी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेत राज्यस्तरीय २३ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताव्रि प्रभारी मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांनी केले. सूत्रसंचलन औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांनी केले. यावेळी प्रक्षिशण केंद्राचे कार्यकारी अभियंता अभिमन्यु चव्हाण, देवेंद्र सायनेकर, अनिल नागरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कामगारांच्या बळावरच महावितरणची प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:12 AM