कॉँग्रेसचे उमेदवार ठरणार भुजबळ यांच्या सल्ल्याने

By श्याम बागुल | Published: September 23, 2019 07:31 PM2019-09-23T19:31:03+5:302019-09-23T19:35:09+5:30

गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ नाशकात तळ ठोकून असून, मित्रपक्षांसोबत विधानसभा निवडणुकीची राजकीय व्यूहरचना करीत आहेत. राष्टÑवादीतील अनेक आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षापासून फारकत घेतल्याने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससाठी अधिक महत्त्वाची आहे.

With the advice of Bhujbal who will be the Congress candidate | कॉँग्रेसचे उमेदवार ठरणार भुजबळ यांच्या सल्ल्याने

कॉँग्रेसचे उमेदवार ठरणार भुजबळ यांच्या सल्ल्याने

Next
ठळक मुद्देनाशकात मुक्काम : जिल्हाध्यक्ष, इच्छुकांच्या भेटीगाठी जिल्हा परिषदेचे एका सदस्याला कॉँग्रेसमध्ये पाठविण्यात भुजबळ यांनीच मोठी भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पक्षांतराची विरोधकांकडून चर्चा झडवली जात असताना दुसरीकडे भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्टÑवादीबरोबरच कॉँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या ‘भुजा’त बळ भरण्यास सुरुवात केली आहे. कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांशी गुप्त चर्चा करून भुजबळ यांनी ‘मनात काही ठेवू नका’ असा निरोप देत काही मतदारसंघांत कॉँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांना सर्वोपरि मदत करण्याचा शब्द दिला आहे.


गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ नाशकात तळ ठोकून असून, मित्रपक्षांसोबत विधानसभा निवडणुकीची राजकीय व्यूहरचना करीत आहेत. राष्टÑवादीतील अनेक आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षापासून फारकत घेतल्याने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससाठी अधिक महत्त्वाची आहे. त्यासाठी पक्षाच्या आदेशावरून भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांचा शोध घेण्याबरोबरच मित्रपक्ष कॉँग्रेसचीही अप्रत्यक्ष जबाबदारी उचलली आहे. इगतपुरी मतदारसंघ जागावाटपात कॉँग्रेसला सुटणार असला तरी, येथील कॉँग्रेसच्या आमदाराने सेनेत प्रवेश केल्याने कॉँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याचे पाहून भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे एका सदस्याला कॉँग्रेसमध्ये पाठविण्यात भुजबळ यांनीच मोठी भूमिका बजावल्याची चर्चा होत आहे. या इच्छुकाने कॉँग्रेस प्रवेश करताच, त्यांना पक्षाकडून उमेदवारीचा शब्द मिळवून देण्यात भुजबळ यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जात असून, असाच प्रकार चांदवड मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराबाबत घडला आहे. येथील एका माजी आमदाराने भुजबळ यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याबाबत सल्ला घेतला आहे. भुजबळ यांनीदेखील जागावाटपात काय होते ते बघू, परंतु एकसंघ होऊन काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. रविवारी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनीही भुजबळ यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीची चर्चा केली. सुमारे अर्धातास ‘बंद खोलीत’ सुरू असलेल्या या चर्चेत नेमके काय ठरले हे कळू शकले नसले तरी, निवडणुकीविषयी कॉँग्रेसची सध्याची तयारी, संभाव्य उमेदवार व त्यांची राजकीय गणिते भुजबळ यांनी जाणून घेतली. जागावाटपाची लवकरच घोषणा होईल, त्यानुसार दोन्ही पक्षांनी एकदिलाने काम करण्याचे त्याचबरोबर मनात काही ठेवू नका, काही मदत लागली तर सांगा असा निरोपही कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना भुजबळ यांनी दिला. एकूणच छगन भुजबळ यांच्याकडे पक्षाने राष्टÑवादीबरोबरच कॉँगे्रसचीही जबाबदारी सोपविल्याचे दिसू लागले आहे.

Web Title: With the advice of Bhujbal who will be the Congress candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.