शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

कॉँग्रेसचे उमेदवार ठरणार भुजबळ यांच्या सल्ल्याने

By श्याम बागुल | Published: September 23, 2019 7:31 PM

गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ नाशकात तळ ठोकून असून, मित्रपक्षांसोबत विधानसभा निवडणुकीची राजकीय व्यूहरचना करीत आहेत. राष्टÑवादीतील अनेक आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षापासून फारकत घेतल्याने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससाठी अधिक महत्त्वाची आहे.

ठळक मुद्देनाशकात मुक्काम : जिल्हाध्यक्ष, इच्छुकांच्या भेटीगाठी जिल्हा परिषदेचे एका सदस्याला कॉँग्रेसमध्ये पाठविण्यात भुजबळ यांनीच मोठी भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पक्षांतराची विरोधकांकडून चर्चा झडवली जात असताना दुसरीकडे भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्टÑवादीबरोबरच कॉँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या ‘भुजा’त बळ भरण्यास सुरुवात केली आहे. कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांशी गुप्त चर्चा करून भुजबळ यांनी ‘मनात काही ठेवू नका’ असा निरोप देत काही मतदारसंघांत कॉँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांना सर्वोपरि मदत करण्याचा शब्द दिला आहे.

गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ नाशकात तळ ठोकून असून, मित्रपक्षांसोबत विधानसभा निवडणुकीची राजकीय व्यूहरचना करीत आहेत. राष्टÑवादीतील अनेक आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षापासून फारकत घेतल्याने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससाठी अधिक महत्त्वाची आहे. त्यासाठी पक्षाच्या आदेशावरून भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील राष्टÑवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांचा शोध घेण्याबरोबरच मित्रपक्ष कॉँग्रेसचीही अप्रत्यक्ष जबाबदारी उचलली आहे. इगतपुरी मतदारसंघ जागावाटपात कॉँग्रेसला सुटणार असला तरी, येथील कॉँग्रेसच्या आमदाराने सेनेत प्रवेश केल्याने कॉँग्रेसकडे या मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याचे पाहून भुजबळ यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे एका सदस्याला कॉँग्रेसमध्ये पाठविण्यात भुजबळ यांनीच मोठी भूमिका बजावल्याची चर्चा होत आहे. या इच्छुकाने कॉँग्रेस प्रवेश करताच, त्यांना पक्षाकडून उमेदवारीचा शब्द मिळवून देण्यात भुजबळ यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जात असून, असाच प्रकार चांदवड मतदारसंघातील संभाव्य उमेदवाराबाबत घडला आहे. येथील एका माजी आमदाराने भुजबळ यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याबाबत सल्ला घेतला आहे. भुजबळ यांनीदेखील जागावाटपात काय होते ते बघू, परंतु एकसंघ होऊन काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. रविवारी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनीही भुजबळ यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीची चर्चा केली. सुमारे अर्धातास ‘बंद खोलीत’ सुरू असलेल्या या चर्चेत नेमके काय ठरले हे कळू शकले नसले तरी, निवडणुकीविषयी कॉँग्रेसची सध्याची तयारी, संभाव्य उमेदवार व त्यांची राजकीय गणिते भुजबळ यांनी जाणून घेतली. जागावाटपाची लवकरच घोषणा होईल, त्यानुसार दोन्ही पक्षांनी एकदिलाने काम करण्याचे त्याचबरोबर मनात काही ठेवू नका, काही मदत लागली तर सांगा असा निरोपही कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना भुजबळ यांनी दिला. एकूणच छगन भुजबळ यांच्याकडे पक्षाने राष्टÑवादीबरोबरच कॉँगे्रसचीही जबाबदारी सोपविल्याचे दिसू लागले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकChagan Bhujbalछगन भुजबळcongressकाँग्रेस