सटाणा : येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांची अचानक झालेली बदली रद्द करावी या मागणीसाठी दसाणे ,केरसाणे ,ब्राम्हणगावसह जुनी शेमळीच्या सरपंचासह ग्रामस्थांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे वाहन अडवून साकडे घातले.शहर व परिसरातील अवैध धंदे चालविणार्यांच्या मुसक्या आवळल्या ,जनतेशी सुसंवाद ठेवून कायदा आण िसुव्यस्था आबाधित ठेवले.असे असतांना पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्याविरु द्ध कोणत्याही तक्र ारी व ठपका नसतांना अचानक त्यांची उचलबांगडी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या .याबाबत अनेकांनी नाराजीची भावना देखील बोलून दाखवत असतांना या भागाचे खासदार व संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे बागलाणच्या दौर्यावर आले असतांना दसाणे येथील वसाकाचे माजी संचालक रामदास सोनवणे ,दसाणे लघुप्रकल्पात बडून मरण पावलेल्या वैभव सोनवणे यांच्या कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक पाटील यांच्या अचानक केलेल्या बदली बाबत नाराजी व्यक्त करत बदली रद्द करण्याची मागणी केली.दरम्यान केरसाणे येथील इंदरिसंग थोरात व ग्रामस्थांनी तर जुनी शेमळी येथील सरपंच अमोल बच्छाव यांच्यासह ग्रामस्थांनी डॉ.भामरे यांचे वाहन अडवून पोलीस निरीक्षक पाटील यांची बदली रद्द करण्याची मागणी केली.यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक पी.टी.पाटील यांनी गुंडांबरोबरच ,अवैध धंदे चालविणार्यांच्या मुसक्या आवळ्या म्हणून त्यांच्या निलंबनाची कारवाई केली.हा मोठा त्यांच्यावर अन्याय केला.आता याच पोलीस ठाण्यात रु जू झालेले पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांना एक वर्षही पूर्ण झाले नाही .तोच त्यांची उचलबांगडी करण्यात आली.शहर व परिसरात शांतता नांदत असतांना अचानक पाटील यांची उचलबांगडी करून त्यांच्यावर देखील मोठा अन्याय करण्यात आला आहे.कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पाटील यांची तत्काळ बदली रद्द करून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.डॉ.भामरे यांनी निवेदन स्वीकारून याबाबत चौकशी करून त्यांना न्याय देण्याचा प्रयन्त करू असे सांगितले.
पोलीस निरीक्षकाची बदली रद्द करण्यासाठी अडविले मंत्र्यांचे वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 6:15 PM