जळगाव नेऊर : ज्वारी पिकासाठी प्रसिध्द असलेल्या मुखेड तसेच लगतच्या जळगाव नेऊर, मानोरी, नेऊरगाव या गावात पूर्वी मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची पेरणी व्हायची. त्यामुळे ज्वारीचे दाणे टिपण्यासाठी होणारा पक्ष्यांचा किलबिलाटही थांबला आहे. मोजक्याच शेतकऱ्यांनी घेतलेल्या ज्वारीच्या पिकांवर चिमणी-पाखरांचा संचार दिसून येत आहे.ज्वारीचा हंगाम समजून येणारी हिमालयीन मैना, पिवळ या पक्ष्यांचे थवे परिसरात दिसून येतात. परिसरामध्ये मोजक्याच शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेतले असून याच ठिकाणी चिमणी-पाखरांचा संचार दिसून येत आहे. ज्वारी पिकाची जागा कांदा, उस, गहू, हरभरा या पिकांनी घेतल्याने ज्वारीचे आगार मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पशुधनासाठी आवश्यक असणारा कडबा प्रचंड महाग होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.पशुपक्ष्यांचीही परवडएकेकाळी परिसरात करडई पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे, त्याही काळात करकोचे, पोपट यांचे थवेच्या थवे परिसरात दिसायचे. परंतु पालखेडचे पाणी आले आणि करडई नामशेष झाली. त्याची जागा ज्वारीने घेतली. आता पालखेडचे बेभरवाशाचे पाणी, सततचा दुष्काळ, अवेळी पडणारा पाऊस यामुळे अन्य पिकाकडे शेतकरी वळाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांबरोबरच पशुपक्षी यांनाही बसताना दिसतो आहे.मी दहा एकर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले आहे. यावर्षी पीकही चांगले आले, पण आजूबाजूला ज्वारीचे पीक नसल्याने मोठ्या प्रमाणात पक्षी आपली भूक भागविण्यासाठी येत आहेत. पूर्वी या परिसरातून मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जात होते. परंतु शेतकरी इतर पिकाकडे वळाल्याने ज्वारीचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.- सचिन आहेर, शेतकरी.
ज्वारीच्या आगारात पशुपक्ष्यांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 6:32 PM
जळगाव नेऊर : ज्वारी पिकासाठी प्रसिध्द असलेल्या मुखेड तसेच लगतच्या जळगाव नेऊर, मानोरी, नेऊरगाव या गावात पूर्वी मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची पेरणी व्हायची. त्यामुळे ज्वारीचे दाणे टिपण्यासाठी होणारा पक्ष्यांचा किलबिलाटही थांबला आहे. मोजक्याच शेतकऱ्यांनी घेतलेल्या ज्वारीच्या पिकांवर चिमणी-पाखरांचा संचार दिसून येत आहे.
ठळक मुद्देनगदी पिकांवर भर : मोजक्याच शेतकऱ्यांकडून लागवड