लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील पेट्रोलपंप दि. १४ मेपासून दर रविवारी बंद ठेवण्याचा आणि दि. १५ मेपासून रोज एकाच शिफ्टमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पंप चालू ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हा पेट्रो डिलर्सच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा पेट्रो डिलर्स असोसिएशनचे सचिव विजय ठाकरे यांनी दिली आहे. नाशिक जिल्हा पेट्रो डिलर्सची बैठक शुक्रवारी होऊन त्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीला संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून पेट्रोलपंपचालक उपस्थित होते. बैठकीत काही ठराव करण्यात आले. त्यात प्रामुख्याने, आॅईल कंपन्या खर्चाचा पूर्ण परतावा देत नसल्याने व वेळकाढूपणा करत असल्याने फामफेडाने खर्च कमी करण्यासाठीच्या सुचवलेल्या योजनांना पाठिंबा देण्यात आला. त्यानुसार दि. १० मे रोजी जिल्ह्यातील पेट्रोलपंप डिझेल व पेट्रोल (टॅँकर) विकत घेणार नाहीत. मात्र सर्व पंपांवर विक्र ी चालू राहील.
१५ मेपासून सायंकाळी ६ नंतर पेट्रोलपंप बंद
By admin | Published: May 07, 2017 1:23 AM