शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

३२ तासांनंतर चेंबरमधून श्वानाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:41 AM

कर्मयोगीनगरच्या नाल्यातील भूमिगत गटारीच्या एका फुटलेल्या चेंबरमध्ये श्वान पडले. येथील श्रीजी सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना श्वानाच्या भुंकण्याचा आवाज आल्याने चेंबरमध्ये श्वान पडल्याचे त्यांच्या रविवारी (दि.१५) लक्षात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून प्राणिप्रेमी संस्थांच्या स्वयंसेवकांनी चेंबरमधून श्वानाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्वयंसेवक व अग्निशमन दलाच्या जवानांना चेंबरमधून श्वानाला जिवंत बाहेर काढण्यात यश आले.

ठळक मुद्देअखेर मिळाले जीवदान : प्राणिप्रेमी, अग्निशमन दलाच्या जवानांना यश

नाशिक : कर्मयोगीनगरच्या नाल्यातील भूमिगत गटारीच्या एका फुटलेल्या चेंबरमध्ये श्वान पडले. येथील श्रीजी सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना श्वानाच्या भुंकण्याचा आवाज आल्याने चेंबरमध्ये श्वान पडल्याचे त्यांच्या रविवारी (दि.१५) लक्षात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून प्राणिप्रेमी संस्थांच्या स्वयंसेवकांनी चेंबरमधून श्वानाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्वयंसेवक व अग्निशमन दलाच्या जवानांना चेंबरमधून श्वानाला जिवंत बाहेर काढण्यात यश आले.गोविंदनगर रस्त्यालगत असलेल्या कर्मयोगीनगरात श्रीजी सोसायटीच्या पाठीमागील नाल्यामधील भूमिगत गटारीचे चेंबर आहेत. या चेंबरपैकी काही चेंबर खालच्या बाजून फुटले आहेत. नाल्यात भटकंती करणारे एक श्वान या फुटलेल्या चेंबरमध्ये पडले. चेंबरमधून वाहत ते लगतच्या दुसºया चेंबरमध्ये जाऊन अडकले. शनिवारी सकाळपासून श्वान सुटका करून घेण्यासाठी जिवाच्या आकांताने भुंकत होते.सकाळी येथील रहिवाशांच्या कानी श्वानाच्या भुंकण्याचा आवाज पडल्याने चेंबरमध्येच श्वान पडल्याची खात्री झाली. वन्यजीवप्रेमी इको-एको, श्वानप्रेमी संस्था शरण तसेच अग्निशमन दलाशी संपर्क साधत नागरिकांनी चेंबरमध्ये पडलेल्या श्वानाच्या जीव वाचविण्यासाठी मदत मागितली.प्राणिप्रेमींचे अथक प्रयत्नसंस्थेचे अभिजित महाले, अनुपम सराफ, शिवम आहेर, निखील डोंगरे, रवी जमदाडे यांनी दोरखंड, जाळी, बांबू, लोखंडी शिडी, क्लाईम्बिंगचे साहित्य घेऊन घटनास्थळी सकाळी धाव घेतली. चेंबर आकाराने मोठे आणि दोन्ही बाजूने इमारतीच्या संरक्षक भिंती असल्यामुळे चेंबरपर्यंत जाणे कठीण होते. लोखंडी शिडीच्या सहाय्याने चेंबरवर शिवम, निखील उतरले. त्यांना अन्य स्वयंसेवकांनी मदत केली अन् सुरू झाले ‘मिशन श्वान बचाव’. सुमारे चार तास स्वयंसेवकांचे अथक प्रयत्न सुरू होते; मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येत नसल्याने अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली.अग्निशमन दलाची धावदुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास येथील एका जागरूक नागरिकाने अग्निशमन दलाशी संपर्क साधून घटनेची माहिती कळविली. पंधरा मिनिटांत सिडको उपकेंद्राच्या बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. लिडिंग फायरमन रवींद्र लाड, फायरमन अविनाश सोनवणे यांनी शिडीवरून चेंबर गाठले. चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याची अवस्था लक्षात घेत कौशल्याने ‘रेस्क्यू’ला प्रारंभ केला. त्यांना प्राणिप्रेमींसह फायरमन बाळासाहेब लहांगे, इस्माइल काजी, संजय गाडेकर, अशोक गुजर यांनी मदत केली. अर्धा ते पाऊण तासांत जवानांनी श्वानाची चेंबरमधून सुखरूप सुटका केली.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलdogकुत्रा