सिन्नर : शालेय जीवनातील अनेक प्रसंगांच्या एक ना अनेक आठवणींना उजाळा देत तब्बल ३३ वर्षांनंतर लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयातील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्मृतिगंध दरवळला.पंचवटी मोटेल्समधील सभागृहामध्ये वाजे विद्यालयातील १९८६ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. ३३ वर्षांनंतर म्हणजे वयाच्या पन्नाशीत मित्र-मैत्रिणींच्या भेटी झाल्या. विद्यार्थिदशेतील परिस्थिती, प्रसंग आठवत नव्याने ओळख करून द्यावी लागत होती. पती, पत्नी, मुलंबाळं, नोकरी, व्यवसाय आदी विषयांवर चर्चा होऊ लागली. ओळख करून देताना गंमत येत होती.
तब्बल ३३ वर्षांनी भेटले शालेय जीवनातील सवंगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 5:45 PM