मालेगाव : तालुक्यातील टोकडे येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात नाशिक येथे गोल्फ क्लब मैदानावर गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण विठोबा द्यानद्यान यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले.
मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या हस्ते निंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोडे यांनी लोकनियुक्त सरपंच सुपडाबाई इंगळे यांना दोषी धरत पदावरून काढण्याची शिफारस केली आहे. याशिवाय श्रीमती बनसोडे यांनी शाखा अभियंता, उपअभियंता व ग्रामसेवक यांनाही दोषी ठरविले. द्यानद्यान यांनी मागीलवर्षी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयासमोर ६५ दिवस उपोषण केले होते. कारवाई न झाल्याने त्यांनी २५ नोव्हेंबरपासून नाशिक येथे उपोषण केले.