कळवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रथमच कळवण तालुक्यात दाखल झालेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. भारती पवार यांना गहिवरून आले. हा स्वागत सोहळा बघण्यासाठी आज स्व. ए. टी. पवार आज आपल्यात हवे होते, असे भावोद्गार काढताना त्यांना अश्रू अनावर झाले.पालघर ते नंदुरबार जनआशीर्वाद यात्रा आटोपून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या कळवण तालुका दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी डॉ. पवार यांनी सांगितले की, केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीच्या संकटात मोठे काम उभे केले असून, देशातील ५५ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे. असे काम करणारा भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला आहे. तसेच सामान्य महिलांना उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून न्याय दिला आहे तसेच शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना लागू केली आहे. कष्टकरी, शेतकरी, कामगार यांचेही प्रश्न सोडविण्यासाठी माझ्यासारख्या आदिवासी समाजातील अनेक कार्यकर्त्यांना संधी दिल्याचेही केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते सुधाकर पगार हे होते. यावेळी कळवण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने पवार यांचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, महिला अध्यक्ष सोनाली जाधव, गोविंद कोठावदे, विकास देशमुख, सचिन सोनवणे, दीपक वेढणे, सतीश पगार, हितेंद्र पगार, प्रवीण रौंदळ व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक विकास देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. किशोर पगार यांनी केले.सप्तशृंगी देवीचरणी नतमस्तकमंत्रिपद मिळाल्यानंतर डॉ. भारती पवार या पहिल्यांदाच कळवण तालुका दौऱ्यावर आल्या होत्या. आपल्या मायभूमीत सत्कार स्वीकारत त्यांनी सप्तशृंगी देवीच्या गडावर जाऊन पहिल्या पायरीचे दर्शन घेतले. कोरोनापासून संपूर्ण देशाला मुक्ती मिळू दे, असे साकडे यावेळी त्यांनी सप्तशृंगी देवीला घातले. दरम्यान, मतदारसंघाच्याही विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
४६ दिवसांनी केंद्रीय मंत्री भारती पवार परतल्या कर्मभूमीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 10:58 PM
कळवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रथमच कळवण तालुक्यात दाखल झालेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. भारती पवार यांना गहिवरून आले. हा स्वागत सोहळा बघण्यासाठी आज स्व. ए. टी. पवार आज आपल्यात हवे होते, असे भावोद्गार काढताना त्यांना अश्रू अनावर झाले.
ठळक मुद्देकळवणला जोरदार स्वागत : श्वसुर ए.टी.पवार यांच्या स्मृती तरळल्या