ओझर -आपल्या जीवनात माणूस कितीही व्यस्त असला तरी देखील आ पल्या मन पटला वरती शालेय जीवनातील आठवणी सतत कोरलेल्या असतात कारण घरानंतर संस्कार शिदोरी देणारी जीवनात स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ देणारी शिक्षकांचे अमूल्य असे मार्गदर्शन मिळणारी ही शाळाच असते आशा या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते. असा सोहळा १९७८-७९ च्या नवीन इंग्रजी शाळा ओझरच्या माजी विद्यार्थ्यांनी भरविला ४० वर्षानंतर शाळेत प्रवेश करताच आपल्या वर्गखोल्या, पटांगण व इतर जुन्या काळातील आठवणीना उजाळा मिळत, आपल्या काळातील शाळा, शिक्षक या सर्वच आठवणींना मोकळी वाट मिळाली. त्यावेळी असलेले शिक्षक द.तो.वाणी, त्रंबकराव तिडके, लक्ष्मणराव भडके, माधवी कापसे हे देखील उपस्थित होते. या मेळाव्याचे नियोजन व एकत्र करण्याचे महत्त्वाचे काम सुनील बागुल, ओझर नागरी पतसंस्था संचालक रत्नाकर शिंदे, हरिभाऊ भडके,कृषिधन संचालक भास्करराव शिंदे,बाळासाहेब फुलदेवरे,डॉ सुधीर ठोसर यानी केले. विद्यार्थ्यांनी सर्व गुरूंचा सन्मान केला. या मेळाव्याप्रसंगी सरोज भावसार, लीला भरवीरकर,जिजा पुंड,हिरा बोरस्ते,जयश्री जुगाडे, मीरा जंजाळे, सुजाता भिंगे ओझरकर,मालती गायकवाड,प्रतिभा आंबेकर, मंगल करवा,यशोदा शिंदे,मीना चांडक,संजय रत्नपारखी, रामदास शेलार,ललिता बिहानी,अजय लड्डा, अशोक हुजरे,मदन जाधव, शरद कांबळे,लक्ष्मण जोंधळे, शंकर घोलप, सुनिल तांबट,विलास जाधव, अशोक पगारे,यशवंत रिंझड,किसन शिंदे, पद्माकर जाधव, गोविंद जैन यासह दुबई, नागपूर, पुणे,मुंबई,नगर,औरंगाबाद, नाशिक येथील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन उमेश कुलकर्णी यांनी केले तर आभार भास्कर शिंदे यांनी मानले.
४० वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी भरविली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 1:26 PM