शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘गोई’वरून १३ वर्षांनी वाहिले पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:29 PM

मानोरी : परिसरासह सर्वत्र परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मानोरी बुद्रुक येथील सर्वात मोठी नदी असलेल्या गोई नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. बंधाऱ्याची उंची कमी अधिक असल्याने १३ वर्षांनंतर प्रथमच बंधाºयावरून पाणी वाहिल्याचे दिसून आले. परिणामी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला असून, सदर बंधाºयाची भिंत एकसारखी बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मानोरी : परिसरासह सर्वत्र परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मानोरी बुद्रुक येथील सर्वात मोठी नदी असलेल्या गोई नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. बंधाऱ्याची उंची कमी अधिक असल्याने १३ वर्षांनंतर प्रथमच बंधाºयावरून पाणी वाहिल्याचे दिसून आले. परिणामी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला असून, सदर बंधाºयाची भिंत एकसारखी बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पंधरा दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस होत आहे. बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरु वात झाली होती. त्यात सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तसेच संध्याकाळी साडेसहा ते रात्री बारा वाजेपर्यंत झालेल्या जोरदार पावसानंतर मंगळवारी पहाटे गोई नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. सन २००६ मध्ये गोई नदीला महापूर आला होता.या महापुरात नदीवरील अर्धा बंधारा वाहून गेल्याने अर्धा बंधारा लहान तर अर्धा मोठा अशी अवस्था झाली होती. या बंधाºयाची वाहून गेलेली भिंत तत्काळ बांधण्यात आली; मात्र ती अपूर्ण तसेच कमी उंचीची भिंत होती. त्यामुळे काही वर्षांपासून अर्ध्या बंधाºयावरून पाणी वाहत असल्याचे सर्वांना दिसत होते. १३ वर्षांनंतर संपूर्ण बंधाºयावरून पहिल्यांदा पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांनी गर्दी केली होती. संबंधित प्रशासनाने सदर बंधाºयाची संपूर्ण भिंत एकसारखी बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून, बंधारा एकसारखा झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक