मानोरी : येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एक वर्षांपासून बंद असलेली येवला परिवहन महामंडळाची मानोरी बुद्रुक गावातील बस मंगळवार ४ सप्टेबर पासून नियमतिपणे सुरू झाली आहे. बस मानोरी गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांना अतोनात हाल सहन करावे लागत होते. पहाटे पाचवाजता घरातून पायी खडकीमाळ येथे जावे लागत होते.रस्ताच्या दुतर्फा शेती असल्याने सध्या मकाचे पीक मोठ्या उंचीने वाढलेले असल्याने भीती निर्माण झाली होती. तर खडकीमाळ येथून कधी वेळेच्या आधीच बस निघून गेल्याने तेथून मुखेड फाट्यावर पाच किलोमीटर पायी चालत जावे लागत असे. त्यामुळे पंचायत समतिीचे सदस्य प्रवीण गायकवाड आण िशिवसेना नेते छगन आहेर यांनी आगार प्रमुखांना सोमवारी घडलेल्या प्रकारामुळे बस पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आगार प्रमुखांनी मानोरीत बस सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले. आता बस थेट गावात येत असल्याने मुलांचा होणारा त्रास मोठ्या बंद होणार आहे. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी ऋ षिकेश भवर, अजिंक्य वावधाने, महेश बोराडे, किरण डुकरे,नितीन शेळके,संकेत वावधाने, वैभव वावधाने, मयूर शेळके, चेतन वावधाने, समाधान शेळके,गणेश मेमाणे, तुषार शेळके,ऋ षिकेश शेळके, शंभू गव्हाणे,वैष्णवी शेळके ,आरती गायकवाड, सुजाता शेळके विद्यार्थ्यांनी पंचायत समतिीचे सदस्य प्रवीण गायकवाड आण िशिवसेना नेते छगन आहेर यांचे आभार मानले.
अखेर मानोरीला बस सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 6:10 PM