पेठ - महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने चालवण्यात आलेले आदिवासी भागातील एकाधिकार धान्य खरेदी केंद्र नोव्हेंबर मिहना संपत आला तरी सुरू न झाल्याने आदिवासी शेतकºयांना कवडीमोल दरात खुल्या बाजारात धान्य विक्र ी करावी लागत असल्याने पेठ तालुक्यातील करंजाळी परिसरातील संतप्त शेतकरयांनी मागील आठवडयात आंदोलन छेडले होते. शेतकºयांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाला अखेर करंजाळी येथे एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू केले आहे.पेठ सारख्या आदिवासी व दुर्गम तालुक्यात बाजार समतिी नसल्याने शेतकर्यांना आपला शेतमाल विक्र ीसाठी मोठी कसरत करावी लागते. भाजीपाला नाशिक किंवा गुजरातला तर धान्य खुल्या बाजारात खाजगी व्यापाºयांना कवडीमोल भावात द्यावे लागत असल्याने शेतकºयांची आर्थिक कुंचबना होत असल्याने संतप्त शेतकर्यांनी नाशिक - गुजरात महामार्गावर मागील आठवडयात रास्ता रोको आंदोलन छेडले. पोलीस प्रशासन व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाºयांनी मध्यस्थी करत धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकºयांनी आंदोलन स्थगित केले होते. तसेच पेठ तालुका कॉग्रेस कमेटीनेही तहसीलदारांना निवेदन देऊन केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. आदिवासी विकास महामंडळाने दखल घेत करंजाळी येथील एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करून आधारभूत किंमतीप्रमाणे भात, नागली सह इतर धान्याची खरेदी सुरू केली आहे.-----------------शेतकºयांना ई - पेमेंटएकाधिकार धान्य खरेदी केंद्रावर धान्य विक्र ीसाठी आणणार्या शेतकर्यांना एक हजार रूपया पर्यंतची रक्कम रोख स्वरूपात देण्यात येत असून एक हजारपेक्षा अधिक रक्कम ई - पेमेंट द्वारे थेट शेतकर्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने शेतकर्यांनी धान्य विक्र ीला येतांना शेतीचा सात बारा उतारा, आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या पासबुकची झेरॉक्ससोबत आणण्याचे करंजाळी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
अखेर करंजाळीचे धान्य खरेदी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:59 PM