गंगापूर : गिरणारे-वाडगाव रस्त्याची झालेली दुरवस्था व त्याकडे लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ थेट आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या वाडगावकºयांनी अखेर स्वत:च श्रमदानातून रस्त्याची डागडुजी व खड्डे बुजविण्याचे काम हाती घेऊन रस्ता वाहतुकीयोग्य तयार केला आहे.यासंदर्भात दोनच दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. त्याची दखल घेऊन वाडगावचे सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी शिवाजी वाघसरे, उत्तम कसबे, राजेंद्र कसबे, राजेंद्र थेटे, भास्कर निमसे यांच्या पुढाकारातून बुधवारी सकाळी ९ ते ५ वाजेदरम्यान या गिरणारे-वाडगाव रस्त्यावरील साईड पट्ट्यांवरील काटेरी झाडेझुडपे काढून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून वाडगाव-गिरणारे रस्ता धोकादायक अवस्थेत आहे. जिल्हा परिषद सदस्य व आमदार खासदारांपर्यंत पाठपुरावा करूनही या रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने नागरिक त्रस्त व संतप्त होते. गिरणारे गावापासून दिंडोरी तालुक्याशी जोडणाºया या रस्त्यावर अनेक छोटी गावे आहेत.मात्र रस्ता अत्यंत खराब असल्याने शेतकºयांना या रस्त्यावरून आपला शेतमाल विक्रीला ने-आण करण्यासाठी अनेक धोके पत्करावे लागत होते. अनेकदा टोमॅटोची वाहने रस्त्याच्या साईड पट्टीवरून घसरून अपघात होत होते.सध्या टोमॅटोची विक्रीसाठी तेरा ते चौदा गावांचा माल गिरणारेच्या टोमॅटो मार्केटला विक्रीला आणावा लागतो. परंतु हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून, त्यामुळे एसटी बस भर रस्त्यातच बंद पडल्याची घटना घडली होती.
अखेर गावकऱ्यांनीच श्रमदानातून बुजविले खड्डे; वाहनधारकांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:13 AM
गिरणारे-वाडगाव रस्त्याची झालेली दुरवस्था व त्याकडे लोकप्रतिनिधींनी केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ थेट आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या वाडगावकºयांनी अखेर स्वत:च श्रमदानातून रस्त्याची डागडुजी व खड्डे बुजविण्याचे काम हाती घेऊन रस्ता वाहतुकीयोग्य तयार केला आहे.
ठळक मुद्देगिरणारे-वाडगाव रस्त्याचे काम : लोकप्रतिनिधींचा निषेध