नाशिक : नवरात्रोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी महापौर रंजना भानसी यांच्यासह मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना ग्रामदेवता कालिका मातेच्या मंदिरात आरतीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मंदिरात प्रवेश करताच प्लॅस्टिकचा बेसुमार वापर यात्रोत्सवात होत असल्याचे बघून मुंढे यांचा पारा चढला. त्यांनी आरती पार पाडल्यानंतर मंदिर संस्थानाच्या विश्वस्तांनाही धारेवर धरत परिसरातील विक्रेत्यांना संध्याकाळपर्यंतचा ‘अल्टीमेटम’ दिला.मुंढे यांना सकाळी आरतीसाठी कालिका मंदिरात बोलविण्यात आले होते. आरतीचा मान मुंढे यांनी स्विकारला खरा; मात्र आरती झाल्यानंतर त्यांनी अचानकपणे मंदिराच्या आवारात उभारलेल्या विविध प्रसाद व खाद्यपदार्थांच्या दुकानांना भेट दिली. यावेळी विक्रेत्यांनी प्लॅस्टिक पिशव्यांसह वेष्टणांसाठीदेखील प्लॅस्टिकचा केलेला वापर बघून ते प्रचंड भडकले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नुकताच प्लॅस्टिकचा वापर ज्या दुकानात आढळून येईल, ते दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई केली जाईल, असे आदेश दिले आहे. या पार्श्वभूमीवर मुंढे यांनी येथील विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांना याबाबत कल्पना दिली. बुधवार संध्याकाळपर्यंतचा ‘अल्टीमेटम’ मुंढे यांनी विक्रेत्यांना दिला. तातडीने सर्व विक्रेत्यांनी प्लॅस्टिकचा होणारा वापर बंद करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यानंतर मंदिराचे विश्वस्तांनाही त्यांनी कल्पना देत धारेवर धरले. प्लॅस्टिकचा वापर मंदिराच्या आवरात होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांना दिल्या. यावेळी पाटील यांनी त्यांना इको-फ्रेण्डली पिशव्या ज्या मंदिर संस्थानाकडून तयार करण्यात आल्या आहेत, त्या दाखविल्या. या पिशव्या भाविकांना प्रसाद व पूजा साहित्यासाठी मोफत देत असल्याचे सांगितले.
आरतीसाठी आले अन् कारवाई करुन गेले; तुकाराम मुंढेंचा मंदिराबाहेरील दुकानदारांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 1:27 PM
प्लॅस्टिकचा वापर मंदिराच्या आवरात होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांना दिल्या. यावेळी पाटील यांनी त्यांना इको-फ्रेण्डली पिशव्या ज्या मंदिर संस्थानाकडून तयार करण्यात आल्या आहेत, त्या दाखविल्या.
ठळक मुद्दे बुधवार संध्याकाळपर्यंतचा ‘अल्टीमेटम’ मुंढे यांनी विक्रेत्यांना दिलाविक्रेत्यांनी प्लॅस्टिकचा केलेला वापर बघून ते प्रचंड भडकले.