सिन्नर : शेतात जाणाºया वहिवाटीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याच्या आश्वासनानंतर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत उपोषणाला बसलेल्या दशरथ बलक यांच्यासह शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले.शेतात जाणाºया वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत दशरथ बलक यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत सोमवारपासून बेमुदत उपोषणास बसले होते. सिन्नर-पुणे महामार्गावरील मनेगाव फाट्यावरुन देवनदीच्या दक्षिण बाजूने कुंदेवाडील मुसळगाव दातलीपर्यंत जाण्याचा रस्ता आहे. पूर्वीच्या काळी नदीला पाणी आल्याने येणाºया पुरामुळे पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होता. या रस्त्याच्या सुरुवातीला एका शेतकºयाने अतिक्रमण केल्याचा शेतकºयांचा आरोप होता. रस्ता बंद झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे होते.नगर परिषद हद्दीतील खळवाडी ते शिवाजी लोंढे ते राजेंद्र मोठेबुवा गोळेसर यांच्या वस्तीवरून संगमेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता करून द्यावा अशी मागणी बलक यांनी केली होती.या रस्त्यावरील अतिक्रमणापर्यंतचा रस्ता तातडीने खडीकरण करण्यात येईल. त्यांनतर पुढील अडचण सोडविण्यासाठी तहसीलदारांकडे अपील दाखल करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. तसेच उर्वरित दोन रस्त्यांना निधी उपलब्ध होताच नगरपालिकेच्या वतीने त्यांचेही खडीकरणांचे काम करण्यात येईल, असे आश्वासन बलक यांच्यासह शेतकºयांना देण्यात आले. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह तहसीलदार राहुल कोताडे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोंविद लोखंडे, गटनेते हेमंत वाजे, प्रभाकर गोळेसर, राजेंद्र लोंढे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, अभियंता सुरेश गवांदे आदींसह नगरसेवक उपस्थित होते.
आश्वासनानंतर सिन्नरच्या शेतकऱ्याचे उपोषण सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 6:32 PM