नाशिक : जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आता त्यांच्या पाठोपाठ त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात काहीसे समाधानाचे वातावरण आहे.मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने समीर भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखला केला होता. त्यानुसार, आज त्यावर सुनावणी होऊन त्यांना जामीन मंजूर केला. समीर भुजबळ मार्च २०१६ पासून तुरुंगात होते. त्यांना ईडीने मनी लॉन्डरिंग आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटक केली होती.दरम्यान, छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर समीरनेही जामिनासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार आज त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये काहीसे समाधान व्यक्त केले जात आहे. लवकरच त्यांची आॅर्थर रोड कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळ पाठोपाठ समीर भुजबळांनाही जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 5:23 PM