नाशिक : महापालिकेतील सभागृहनेते दिनकर पाटील यांनी स्थायी समिती सभापतींसह महासभेत केलेल्या तक्रारीनंतर आयुक्तांनी अखेर ए. पी. वाघ यांची नगरसचिव पदावरून उचलबांगडी केली असून, नगरसचिव पदाचा कार्यभार सहायक आयुक्त आर. आर. गोसावी यांच्याकडे सुपूर्द केला आहे तर सहायक अधीक्षक आव्हाळे यांच्याकडे सहायक नगरसचिवपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.महिनाभरापूर्वी सभागृहनेता दिनकर पाटील यांनी स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांना पत्र देऊन नगरसचिव ए. पी. वाघ यांच्याकडील कार्यभार काढून घेऊन तो सहायक अधीक्षक आव्हाळे यांच्याकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्यानंतर, मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या प्रश्नावरून सभागृहनेत्यांनी नगरसचिवांवर आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी महापौरांकडे केली होती. त्यापाठोपाठ बुधवारी (दि.२०) झालेल्या महासभेत मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनाची वार्ता सदस्यांपर्यंत न पोहोचविल्याचा ठपका ठेवत नगरसचिवांसह जनसंपर्क विभागावर कारवाईची मागणी केली होती. महासभेनंतर महापौरांनी इंदिरा गांधी रुग्णालयातील अर्भक मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी करण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली त्यावेळीही सभागृहनेत्यांनी नगरसचिवांच्या कारभाराबद्दल नाराजीचा सूर लावला होता. त्यानुसार, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी नगरसचिवांकडून खुलासा मागविला होता. गुरुवारी (दि.२१) मात्र सायंकाळी नगरसचिव ए. पी. वाघ यांच्या हातावर बदलीची आॅर्डर सोपविण्यात आली.वाघ यांच्याकडील नगरसचिव पदाचा कार्यभार काढून घेत तो प्रभारी मूल्य निर्धारण व कर संकलन अधिकारी आर. आर. गोसावी यांच्याकडे सोपविण्यात आला तर सहायक नगरसचिवपदाचा कार्यभार आव्हाळे यांच्याकडे देण्यात आला. वाघ यांच्याकडे कामगार कल्याण अधिकारीपदाबरोबरच आर. आर. गोसावी यांच्याकडील झोपडपट्टी निर्मूलन विभागाच्या प्रमुखपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे....या कारणांचीही चर्चानगरसचिव ए. पी. वाघ यांची उचलबांगडी होण्यास इतरही कारणांची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती. मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मागे घेणारा विनंती अर्ज तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी पाठवूनही तो महासभेत नगरसचिवांनी वाचून दाखविला नाही. याशिवाय, याच प्रकरणी राष्टÑवादीचे आमदार जयंत जाधव यांनीही विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळेच आयुक्तांनी बदलीची कारवाई केल्याची चर्चा होती.पदाधिकाºयांचा वाढता हस्तक्षेपसत्ताधारी भाजपाच्या काळात प्रशासकीय कामकाजात पदाधिकाºयांचा वाढता हस्तक्षेप हा अधिकाºयांना डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यामुळेच वर्षभरात सुमारे १० अधिकाºयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता बदलीसत्र राबवून अधिकाºयांना लक्ष्य केले जात असल्याची भावना अधिकारी वर्गात बोलून दाखविली जात असून, आयुक्तही सत्ताधाºयांच्या मर्जीने काम करत असल्याबद्दल खंत व्यक्त केली जात आहे.
सभागृहनेत्याच्या तक्रारीनंतर नगरसचिवाची उचलबांगडी गोसावींकडे कार्यभार : सहायक नगरसचिवपदी आव्हाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 1:02 AM
नाशिक : महापालिकेतील सभागृहनेते दिनकर पाटील यांनी स्थायी समिती सभापतींसह महासभेत केलेल्या तक्रारीनंतर आयुक्तांनी अखेर ए. पी. वाघ यांची नगरसचिव पदावरून उचलबांगडी केली असून, नगरसचिव पदाचा कार्यभार सहायक आयुक्त आर. आर. गोसावी यांच्याकडे सुपूर्द केला आहे
ठळक मुद्देनगरसचिवांवर आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणीजनसंपर्क विभागावर कारवाईची मागणी