शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

पंधरा वर्षांनंतर शंभरफुटी मार्ग मोकळाझोपडपट्टी भुईसपाट : महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:20 AM

इंदिरानगर : वडाळागावातील पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभरफुटी रस्त्याने अखेर पंधरा वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. महापालिकेने सोमवारीही (१८) अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत सुमारे ४० झोपड्या जमीनदोस्त केल्या. महापालिकेने राबविलेल्या या मोहिमेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देपंधरा वर्षांनंतर शंभरफुटी मार्ग मोकळाझोपडपट्टी भुईसपाट : महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम

इंदिरानगर : वडाळागावातील पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभरफुटी रस्त्याने अखेर पंधरा वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. महापालिकेने सोमवारीही (१८) अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत सुमारे ४० झोपड्या जमीनदोस्त केल्या. महापालिकेने राबविलेल्या या मोहिमेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे.दहा वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्ग यांना जोडणारा शंभरफुटी रस्ता बनवण्यात आला होता. परंतु पांढरी आई चौक ते मांगीरबाबा चौक या शंभरफुटी रस्त्याच्या मधोमध आणि दुतर्फा अनधिकृत झोपड्या असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असे. या अतिक्रमणामुळे लहान-मोठे अपघात होऊन वादविवादाच्याही घटना घडत होत्या. वारंवार या रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरणाचा प्रश्नही चर्चेत येत होता. मात्र रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या झोपड्या आणि नागरिकांचे पक्के बांधकामांचे अतिक्रमण अडथळा ठरत होते. मात्र शनिवारपासून महापालिकेने हाती घेतलेल्या झोपडपट्टी अतिक्रमण निर्मुलन मोहिमेमुळे श्रीश्री रविशंकर या शंभरफुटी मार्गाला सावित्रीबाई फुले झोपडपट्टीत लागलेले ग्रहण सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भंगारवाल्यांची कमाईमहापालिकेने संपूर्ण झोपडपट्टी भुईसपाट केली. मोहिमेनंतरही रहिवाशांनी उद्ध्वस्त झोपड्यांमधून आपले सामान शोधण्यासाठी गर्दी केली होती, तर भंगार व्यावसायिकांनीही चांगली कमाई केली. भंगार खरेदी करण्यासाठी काही व्यावसायिक चकरा मारत होते. अनेकांनी सामान काढून घेत दुसरीकडे आसरा शोधण्यास सुरुवात केली, तर महापालिकेने तातडीने बांधकामाचे ढिगारे हटविण्यास सुरुवात केली.सदर झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना महापालिकेने लगतच उभारलेल्या इमारतीत घरकुल उपलब्ध करून दिले होते. परंतु, घरकुलांचा ताबा घेऊनही अनेकांनी आपल्या झोपड्या मात्र कायम ठेवल्या होत्या. अखेर महापालिकेने शनिवारी (दि.१६) झोपड्यांवर जेसीबी चालविला तर उर्वरित कारवाई सोमवारी करण्यात आली.शनिवारी ३५० झोपड्या तर सोमवारी पुन्हा मोहीम राबवून सुमारे ४० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. याप्रसंगी पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सुनीता कुमावत यांच्यासह मनपा अधिकारी यांच्यासह १०० पोलीस कर्मचारी तैनात होते.