नाशिक : मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाजानेही आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. देशातून होणारी शेळ्या-मेंढ्यांची निर्यात तत्काळ सुरू करून धनगर समाजावर होणारा अन्याय थांबवावा. तसेच आरक्षण आमच्या हक्काचं आहे, ते आम्हाला मिळालेचपाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी धनगर समाजाच्या संघर्ष समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापुढे धरणे आंदोलन करण्यात आले.सोमवारी (दि.१३) धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शालिमार येथील आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. सत्ताधारी भाजप सरकारने निवडणुकांदरम्यान धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले; मात्र बहुमताने सत्ता मिळविल्यानंतर आश्वासनाचा सरकारला विसर पडल्याचा आरोप यावेळी निवेदनातून करण्यात आला. सरकारने धनगर समाजावर होणारा अन्याय थांबवावा, शेळ्या-मेंढ्यांची निर्यात तातडीने सुरू करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, धनंजय माने, नवनीत विजरे, डॉ. तुषार चिंचोले, भाऊसाहेब ओहळ, सतीश रावते आदी उपस्थित होते.
मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाजानेही आरक्षणासाठी एल्गार पुकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:01 AM