बागलाणचे तहसीलदार सुनील सौंदाणे व आमदार दीपिका चव्हाण यांच्यात वाद झाल्याने त्यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली होती. मात्र सौंदाणे यांच्यावर केलेली कारवाई अन्यायकारक असल्यामुळे त्यांनी मेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे शासनाने बागलाणचा कार्यभार प्रभारी अधिकाºयांकडे दिला होता. कायमस्वरूपी तहसीलदार नसल्यामुळे शेतकरी व सामान्य जनतेचे हाल होत असल्यामुळे मनसेने वेळोवेळी आंदोलने केली .आमदार चव्हाण यांनी देखील विधिमंडळाच्या अधिवेशनात आंदोलन छेडले होते. याची दखल घेत बागलाणला कायमस्वरूपी तहसीलदार देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या ठिकाणी नंदुरबारचे तहसीलदार प्रमोद हिले यांची बदली करण्यात आली आहे. तहसीलदार हिले सोमवारी रु जू झाले असून त्यांनी कुंवर यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. यावेळी तलाठी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव अहिरे यांनी तहसीलदार हिले यांचे स्वागत केले. याप्रसंगी संघटनेचे नितीन मेधने, भाऊसाहेब कुलकर्णी, भाऊसाहेब धिवरे, भामरे, जयप्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते.
बागलाणला लाभले नऊ महिन्यानंतर कायमस्वरूपी तहसीलदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 8:09 PM