नाशिक : शेताच्या बांधावर झाडे लावण्यास विरोध करत एका शेतकऱ्याने थेट दुसºया शेतकºयावर वैरण कापण्याच्या कोयता चालवून गंभीर जखमी केल्याची घटना नानेगाव रस्त्यावर घडली तर दुसºया घटनेत फूलांना पाणी मारण्यासाठी न विचारता पाण्याची बाटली घेतली या क्षुल्लक कारणावरून विक्रेत्यांमध्ये फुलबाजारात ‘फ्रि-स्टाईल’ झाली. या दोन्ही घटनांप्रकरणी देवळाली कॅम्प व पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदीप सुकदेव काळे (रा. नाणेगावरोड, देवळाली कॅम्प) असे पहिल्या घटनेत मारहाण करणाºया संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी संदीप बहीरू शिरसाठ (रा. रेणुका फार्महाऊस, नानेगावरोड) यांनी पोलिसांकडे तक्र ार दाखल केली आहे. शिरसाठ हे त्यांच्या झाडाच्या बांधावर वृक्षारोपण करत असताना काळे याने सामाईक बांधावर झाडे लावण्यास विरोध केला. यामधून वाद होऊन काळे याने शिरसाठ यांना बेदम मारहाण करत वैरण कापण्याच्या कोयत्याने डोक्यावर वार करून दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दुस-या घटनेत फुलबाजारांत शेजारी-शेजारी फूलव्रिकीचे दुकान थाटणा-या विक्रेत्यांमध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून जुंपली. ुलांवर पाणी मारण्यासाठी न विचारता पाण्याची बाटली घेतली यामुळे दोघांमध्ये वाद होऊन संशियताने एकास बेदम मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी घडला.याप्रकरणी यशवंत मधुकर सोळसे (रा. शेरे मळा, गणेशवाडी) यांनी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसर शनिवारी दुपारी फुलांवर पाणी मारण्यासाठी पाण्याची बाटली घेतली. या कारणातून संशियत गुलाब रमेश तराळ (रा. शेरेमळा, गणेशवाडी) याने सोळसे यास शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच लोखंडी पाईपने डावे हातावर मारून दुखापत केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झाडे लावण्यावरून बांधावर तर फूलांंवर पाणी मारण्यावरून बाजारात जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 7:03 PM