देवळा : राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर रविवारी देवळा येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात विक्र ेत्यांनी प्लॅस्टिक पिशवी वापरण्यास फाटा दिल्याचे चित्र दिसून आले. प्लॅस्टिक पिशवीऐवजी पेप रद्दीचा वापर करत प्लॅस्टिकबंदीचे विक्रर्त्यांनी स्वागत केले आहे. सोशल मीडियावर तसेच नागरिकांमध्ये प्लॅस्टिकबंदीवर चर्चा सुरू होती. पेपर रद्दीचा भाव मात्र चांगलाच वधारला आहे. यापुढे पेपर रद्दीला चांगले दिवस येऊन प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशव्यांच्या उद्योगाला चालना मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. देवळा येथे रविवारी भरणाºया आठवडे बाजारात भाजीपाला, भेळभत्ता, किराणा, मांस आदींची विक्र ी करणारे व्यावसायिक यापूर्वी ग्राहकांना माला देतांना सर्रास ५० मायक्र ॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत होते. यामुळे आठवडे बाजाराच्या दुसºया दिवशी त्या परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा पसरलेला दिसून येत असे. प्लॅस्टिकबंदीनंतर मात्र या विक्र ेत्यांनी पेपर रद्दीचा वापर करत प्लॅस्टिक पिशवीला फाटा दिला. बाजारात येणारे ग्राहकदेखील कापडी पिशव्यांचा वापर करण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र बघावयास मिळाले. प्लॅस्टिकबंदीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, पर्यावरणाप्रति नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत असल्याचे सकारात्मक चित्र बघावयास मिळत आहे.
प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर रद्दीचे भाव वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:54 AM