नाशिक : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही नाशिकमधील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तब्बल १४ हजार ३६२ जागा रिक्त असून या रिक्त जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी मंगळवारी (दि. १५) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. तिसऱ्या यादीत कला शाखेच्या ७२२, वाणिज्यच्या १ हजार ३६६, विज्ञान शाखेच्या १ हजार ९७१ तर एमसीव्हीसीच्या ५२ अशा एकूण ४ हजार १११ विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि. १८) डिसेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी मंगळवारी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली. यात अनेक महाविद्यालयांचा विज्ञान शाखेचा कटऑफ ८५ टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून येत आहे. केटीएचएम महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा कटऑफ ७९.६ तर विज्ञान शाखेचा ९१.४ टक्के जाहीर झाला. त्यानंतर पंचवटी महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा कटऑफ ८६.८, एचपीटी महाविद्यालय विज्ञान शाखेचा कटऑफ ९१.४ टक्के आहे. या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी १८ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत सुमारे ८ हजार १४०, तर दुस-या फेरीत २ हजार ६५० विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. दोन्ही फे-यांमध्ये एकूण १० हजार ७९० प्रवेश निश्चित झाले आहे.
------
खुल्या प्रवर्गाचा कटऑफ
जी. डी. सावंत
कला ४९.६
वाणिज्य (मराठी) ६२.२
विज्ञान (विनाअनुदानित) ८४
------
पंचवटी
कला ६५.६
वाणिज्य (मराठी) ६९.८
विज्ञान ८६.८
--------
एचपीटी, आरवायके
कला ७२
विज्ञान ९१.४
---------
बीवायके
वाणिज्य ८८.२
वाणिज्य (विनाअनुदानित) ८७.८
---------
व्हीएन नाईक
कला ६६.६
वाणिज्य ७१
विज्ञान (विनाअनुदानित) ८८.८
----------
भोसला मिलीटरी कॉलेज
कला ६८.४
वाणिज्य (मराठी) ८३.६
विज्ञान ८५
----------
केटीएचएम
कला ६९.६
वाणिज्य (मराठी) ७९.६
वाणिज्य (इंग्रजी) ८७.४
विज्ञान ९१.४
------