नाशिक : महापालिका क्षेत्रातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा अभ्यासक्रम असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत राबविण्यात आलेल्या अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत एकूण २० हजार ७१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यंदाच्या वर्षी २१ हजार ५७३ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली होती. त्यापैकी नियमित व विशेष फेऱ्यांच्या माध्यमातून सुमारे १७ हजार ६९९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत, तर १० हजार ५५२ विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश न घेता इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे पसंत केले.अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार शेवटची प्रवेश फेरी राबविण्यात आली. या फेरीद्वारे बुधवारपर्यंत (दि. १२) प्रवेशाची अखरेची संधी देण्यात आली होती. अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत आतापर्यंत पहिल्या चार नियमित फेऱ्यां, एक विशेष फेरी आणि त्यानंतर प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य यानुसार पहिली फेरी राबविण्यात आली. प्रवेश न मिळू शकलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दुसरी फेरीही राबविण्यात आली. या फेरीनंतरही फेरपरीक्षेतील अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशापासून वंचित असल्याने त्यांच्यासाठी पुन्हा प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, कोटा प्रवेशांतर्गत ३०१४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, आतापर्यंत एकूण २० हजार ७१३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. शाखानिहाय प्रवेशित विद्यार्थीअकरावीच्या कला शाखेत तीन हजार ३४१ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश घेतला आहे, तर वाणिज्य शाखेत ६ हजार ५९७, विज्ञान शखेत ६ हजार ७९४ संयुक्त शाखा ९६२ व इनहाउस, अल्पसंख्यासह विविध कोट्यांतून ३ हजार १४ विद्यार्थ्यांसह एकूण २० हजार ७१३ विद्यार्थी अकरावीत दाखल झाले आहेत.
नाशिकमध्ये सात फेऱ्यांनंतर २० हजार ७१३ विद्यार्थ्यांचे अकरावीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 6:07 PM
महापालिका क्षेत्रातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा अभ्यासक्रम असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत राबविण्यात आलेल्या अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत एकूण २० हजार ७१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यंदाच्या वर्षी २१ हजार ५७३ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली होती. त्यापैकी नियमित व विशेष फेऱ्यांच्या माध्यमातून सुमारे १७ हजार ६९९ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत, तर १० हजार ५५२ विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश न घेता इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे पसंत केले.
ठळक मुद्देअकरावी प्रवेशाच्या सात फेऱ्या पूर्ण२० हजार ७१३ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश