इंदिरानगर : होळीच्या दिवशी इंदिरानगर-वासीयांच्या रागाचे कारण ठरलेल्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर नादुरु स्त झालेली मुख्य जलवाहिनी काही तासांत दुरुस्त करून सायंकाळी कमी दाबाने का होईना पाणी दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पाणी समस्येमुळे प्रभाग ३० चे नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे आणि अॅड. श्याम बडोदे यांनी प्रभागातील महिलांसमवेत हंडा मोर्चाची तयारी केली होती. महापालिकेच्या अधिकाºयांनी लेखी आश्वासन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र रविवारी (दि.४) चढ्ढापार्क येथील पाण्याच्या टाकीची मुख्य जलवाहिनी नादुरु स्त झाल्याने हजारो लिटर पाणी तर वाया गेलेच मात्र त्यामुळे बजरंग सोसायटी, परबनगर, रथचक्र चौक आदी भागात आजचा पाणीपुरवठा झाला नाही. नागरिक संतप्त झाले मात्र सकाळपासून पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी आणि कर्मचाºयांनी युद्धपातळीवर ही जलवाहिनी दुरु स्त करण्याचे काम हाती घेतले. सायंकाळी साडेसात वाजता ते काम पूर्ण करून कमी दाबाने का असेना जेथे पिण्याचे पाणी मिळाले नाही त्या भागात रात्री आठ वाजता पाणी देण्यास सुरु वात केली. त्यामुळे दिवसभर तहानलेल्या इंदिरानगरमधील या परिसरातील नागरिकांना तर दिलासा मिळाला.
‘शिमगा’ केल्यानंतर अखेर जलवाहिनी दुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 1:03 AM