नाशिक : येवला, मनमाडसह पाणीपुरवठा योजनांसाठी पालखेड धरणातून आवर्तन पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी सोडले असले तरी, निफाड, येवला तालुक्यांत पावसाने दिलेली ओढ व दुबार पेरणीचे उभे ठाकलेले संकट पाहता कालव्यावाटे जाणाºया या पाण्याची वाटेत चोरी होण्याची भीती आता अधिकाºयांना वाटू लागली असून, चोरी थांबविण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे.पालखेडमधून डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली, त्यावेळी पाटबंधारे, जिल्हा प्रशासन व पोलीस खात्याकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातून सुटणारे पाणी वाटेत नाशिक, निफाड या तालुक्यांतून पुढे येवला व नंतर मनमाडपर्यंत पोहोचविले जाते.अशा परिस्थितीत या पाण्याची वाटेत चोरी केली जात असल्याचे आजवरची अनेक उदाहरणे आहेत. कालव्यात जमिनीखाली डोंगळे टाकून तसेच पाइपलाइनच्या माध्यमातून शेतकºयांकडून चार ते पाच किलोमीटरपर्यंत पंपाच्या सहाय्याने पाणी नेले जाते. त्यामुळे जेव्हा पाणी सोडण्याची वेळ येते, तत्पूर्वीच मोठी खबरदारी घेत, कालव्याच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करणे, पाणीचोरी रोखण्यासाठी पोलीस व पाटकºयांची गस्त ठेवणे, कालव्यातील डोंगळे जेसीबीच्या सहाय्याने उद््ध्वस्त करणे आदी उपाययोजना केली जाते. परंतु १ आॅगस्ट रोजी पालखेड धरणातून ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यापूर्वी पाटबंधारे खाते, महसूल व पोलीस खात्याने कोणतीही उपाययोजना केली नाही. गेल्या आठवड्यात पाटबंधारे खात्याने जिल्हाधिकाºयांकडून पाणी सोडण्याची अनुमती घेतली. येवला, मनमाड शहर, रेल्वे, पाणीपुरवठा योजनांसाठी सदरचे पाणी सोडण्यात आले असून, दोन दिवसांत सदरचे पाणी सुमारे ५० किलो मीटरपर्यंत पोहोचल्यानंतर पाटबंधारे खात्याला उपाययोजनांची आठवण झाली आहे.जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी, सिन्नर, निफाड, नांदगाव या तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली आहे. निफाड तालुक्यात तर जेमतेम पाऊस झाला असून, शेतकºयांनी पावसाच्या भरवश्यावर पीक पेरणी केली असली तरी, आता पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शेतकºयांना पिके जगविण्यासाठी पाण्याची नितांत निकड भासू लागली असून, अशा परिस्थितीत पालखेडमधून पाणी सोडण्यात आल्याने वाटेत पाण्याची चोरी होण्याची भीती पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांना भेडसावू लागली आहे. त्यासाठी आता त्यांनी डोंगळे काढणे, पाणीचोरीवर पोलिसांची गस्त ठेवण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.
पाणी सोडल्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 1:49 AM
नाशिक : येवला, मनमाडसह पाणीपुरवठा योजनांसाठी पालखेड धरणातून आवर्तन पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी सोडले असले तरी, निफाड, येवला तालुक्यांत पावसाने दिलेली ओढ व दुबार पेरणीचे उभे ठाकलेले संकट पाहता कालव्यावाटे जाणाºया या पाण्याची वाटेत चोरी होण्याची भीती आता अधिकाºयांना वाटू लागली असून, चोरी थांबविण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे.
ठळक मुद्देपालखेडचे आवर्तन पाटबंधारे खात्याला पाणीचोरीची भीती