ओझर :ओझरचा मंगळवार आठवडेबाजार म्हणजे मोठ्याप्रमाणावर उलाढालीचा दिवस परंतु हाच बाजार सध्या विक्र ेत्यांबरोबच बाजारकरूनागरिकांचा जीवघेणा ठरू पाहत आहे.तुकाराम कॉम्प्लेक्स जवळील महादेवमठाकडे क्र ॉसिंगचे भयानक चित्र पहायला मिळते. मुख्य महामार्गावर अर्ध्याहून अधिक जागेत सध्या विक्र ेत्यांनी ठाण मांडल्यामुळे पोलिसांना होणारी वाहतूक कोंडी दूर करणे अवघड झाले आहे. महामार्ग ओलांडणारे नागरिक जीवमुठीत धरून रस्ता ओलांडत असून महामार्गाच्या उड्डाण पुलाच्या कामामुळे नेमका येथेच दोन्ही सर्विसरोड एकत्र होणारा मार्ग ग्रामपंचायतने ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे मारु तीवेस पुलावर ट्रॅक्टर लावून वाहतूक बंद केली असली तरी बाणगंगा नदीवरील पुल व कठड्यावर विक्र ेते ठाण मांडतात. जागेच्या कमतरतेमुळे अगदी तोकड्या जागेत कसेबसे विक्र ेते भाजीपाला विकतात.त्यामध्ये महिला आपल्या लहान चिमुकल्यांनाबरोबर पोटाशी धरून भाजीपाला विकतात त्यात एखादयाचा तोल गेला तर सुमारे २० फूटाहुन अधिक खोल पात्रात पडण्याची भीती व्यक्त होत आहे जर कोणी पडलच तर जबाबदार कोण? घाणीच्या पाण्याने दूषित बाणगंगा आरोग्यावर परिणाम करते कारण दररोज लाखो डासांची उत्पत्ती पाण्यातूनच होते मंगळवारी उसळणारी गर्दी म्हणजे डासांची मेजवाणीच दूषित धूर आण िनदीचे दुषित पाण्यामुळे वेळीच दक्षता न घेतल्यास आरोग्याचा प्रश्न गंभीर बनेल महामार्गावर पोलीस देखील हतबल असून इतक्या मोठ्या गर्दीवर आण िवाहनांवर नियंत्रण मिळवणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे.त्यामुळे ग्रामपालिकेने त्यांचे कर्मचारी उभे करणे गरजेचे आहे.
ओझरला आठवडे बाजारामुळे महामार्ग ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 2:15 PM